हिंदु संस्कृतीशी साम्य असलेल्या विश्‍वातील प्राचीन संस्कृती

Article also available in :

 

१. पाश्‍चात्त्य इतिहासकारांचा हिंदुद्वेष!

‘आजपासून ४ सहस्र वर्षांपूर्वी ज्या सभ्यता-संस्कृती जिवंत होत्या, त्यांना पाश्‍चात्त्य इतिहासकारांनी प्राचीन सभ्यता समजूनच मानवाचा इतिहास आणि समाज यांचे विश्‍लेषण केले; परंतु त्यांचे हे विश्‍लेषण ख्रिस्ती धर्म स्थापित करणारे होते. यासाठी त्यांनी भारत आणि चीन यांच्या इतिहासाला महान असल्याचे दर्शवणारी अशी कितीतरी उदाहरणे नाकारली. वास्तविक ख्रिस्तानंतरच्या समाजापेक्षा कितीतरी अधिक सभ्य असल्याचे ते सिद्ध होत आहेत. प्राचीन सभ्यता आणि संस्कृती यांच्यावर झालेल्या संशोधनामध्ये अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. उदा. त्यांचा अन्य ग्रहांवरील लोकांशी संबंध होता आणि तेही वीजनिर्मितीचे तंत्र जाणत होते इत्यादी.

पृथ्वीवर पसरलेल्या प्राचीन सभ्यतांवर बोलायचे झाले, तर पृथ्वीच्या पश्‍चिम टोकावर रोम, ग्रीस आणि मिस्र या देशांच्या सभ्यता-संस्कृतींचे नाव घेतले जाते, तर पृथ्वीच्या पूर्व टोकावर चीनचे नाव घेतले जाते. पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या भारताचा मात्र केवळ पुसटसा उल्लेख करून सोडून दिले गेलेे; कारण भारताला जाणून घेतल्यावर पाश्‍चात्त्य समाज आणि धर्म यांचे सर्व मापदंड ढासळू लागतात. खरेतर भारतीय संस्कृती युनान, रोम, मिस्र, सुमेर आणि चीन यांच्या संस्कृतींपेक्षाही प्राचीन आहे.

 

२. चिनी (पीत नदीचे खोरे (घाट) ख्रिस्ताब्द पूर्व ३००० वर्षे)

मूळ रूपाने चिनी लोक निसर्गाचे उपासक आहेत. ते सूर्य, चंद्र, आकाश, पृथ्वी आणि पाऊस यांची पूजा करत होते. तेथे राजाला ईश्‍वर समजले जात होते. कालांतराने चीनची धार्मिक विचारसरणी प्रभावित झाली.

 

३. सुमेरिया (ख्रिस्ताब्द पूर्व २३०० वर्षे)

सुमेरिया निवासी आस्तिक आणि मूर्तीपूजक होते. तेही मंदिरे बांधायचे आणि त्यात त्यांच्या इष्ट देवतांच्या मूर्ती स्थापन करून त्यांची पूजा-अर्चा करत होते.

हिंदु संस्कृतीवर आधारित ही सभ्यता ख्रिस्ताब्द पूर्व २००० च्या पूर्वीच समाप्त झाली. सुमेरिया संस्कृतीचे वर्ष भारतियांसारखेच १२ मासांचे होते. त्यांची मास गणनाही चंद्राच्या गतीवर आधारित होती. त्यामुळे प्रत्येक तिसर्‍या वर्षी एक मास वाढत होता, जसे हिंदूंमध्ये ‘अधिक मास’ असतो तसाच. हिंदूंप्रमाणेच अष्टमी आणि पौर्णिमा या तिथींचे ते मोठ्या उत्साहाने स्वागत करत होते. पाश्‍चात्त्य इतिहासकारांप्रमाणे मोहेन्जोदोडोची लिपी आणि मोहरा, सुमेरी लिपी अन् मोहरा यांच्याशी मिळतीजुळती आहे. सुमेरच्या प्राचीन ऊर शहरात भारतात बनलेल्या चुना-मातीची भांडी सापडली आहेत. मोहेन्जोदोडोची नंदीची मूर्ती, सुमेरच्या वृषभाशी मिळते आणि हडप्पामध्ये मिळालेल्या शृंगारदान सारखी पेटी ऊरमध्ये सापडलेल्या शृंगारदान पेटीसारखी आहे. ‘सुमेर’ शब्दही आम्हाला पौराणिक पर्वत सुमेरूचे स्मरण करून देतो.

– डॉ. सुभाष कौशिक, एम्.ए. (हिंदी, इतिहास) बी.एड्, पी.एच्.डी., साहाय्यक संचालक-राजस्थान प्राथमिक शिक्षण परिषद, जयपूर

३ अ. सुमेरियावासी हिंदु असणे

एकेकाळी मेसोपोटामिया हे भारतीय सभ्यतेचे केंद्र होते. त्या प्रदेशात भारतीयच जाऊन राहिले होते. युक्रेटीज आणि टाइग्रिस नद्यांच्या विस्तृत काठांवर ‘सुमेर’ नावाचा एक सुसंस्कृत समाज रहात होता, अशी इतिहासाच्या पानांवर नोंद आहे. ते लोक भारतातून इराणमार्गे या क्षेत्रात पोचले होते. त्यांनी ‘इरीदू’ बंदराजवळ त्यांची वस्ती आणि शासनव्यवस्था स्थापन केली. त्यांचा पहिला राजा होता ‘उक्कुसि’ जो ‘इक्ष्वाकु’ शब्दाचा अपभ्रंश आहे.

महाभारताच्या वेळी भारताच्या एका प्रांताचे नाव सुराष्ट्र आणि त्यातील निवासींना ‘सुवर्ण’ म्हटले गेले आहे. हे ‘सुवर्ण’ सुमेर होते. ‘सुमेरचा ’अर्थ आहे ‘चांगली जात’. हाच अर्थ सुवर्णचाही होतो. त्या दिवसांमध्ये भयंकर महापूर आले, अतीवृष्टी झाली, ज्यामध्ये सुमेर सभ्यतेचे महत्त्वपूर्ण दुर्ग (किल्ले) जमीनदोस्त झाले. आता ‘किश’ आणि ‘उर’ क्षेत्रातील खोदकामात असे प्रमाण मिळाले आहेत, ज्यातून त्या क्षेत्रात वसलेल्या सुमेर समाजाची संपन्न स्थिती समजून येते आणि असे वाटते की, ते भारतीय धर्मानुयायी होते अन् सूर्यपूजा करत होते.

निप्पुरमध्ये अतीविशाल सूर्यमंदिर होते. श्रीविष्णूचे वाहन गरुडाच्याही प्रतिमा त्या भागात मिळाल्या आहेत. इक्ष्वाकु राजाच्या मुद्राही खोदकामात प्राप्त झाल्या आहेत. ‘वोनजकोई’ या ठिकाणी खोदकामामध्ये वरुण देवतेची मूर्ती मिळाली आहे. जसे पूर्वीच्या काळी भारतात रथ चालवले जात होते, अगदी हुबेहूब त्याच प्रकारचे रथ सापडले. मृताच्या अग्नीसंस्काराचेही पुरावे मिळाले आहेत.

वोनजकोईच्या खोदकामात पुरातत्व अन्वेषण तज्ञ जर्मन संशोधक हूयगो विंकलर यांना एक शिलालेख मिळाला आहे, ज्यातून असे सिद्ध होते की, मेसोपोटामियाचे भारतीय धर्मानुयायी मितानीवंशी राजा दशरथने भारतीय देवतांची साक्ष देऊन एक मैत्री संधी केली. हा लेख ख्रिस्ताब्दच्या १३६० वर्षापूर्वीचा आहे. यामध्ये शव दत्त, सुवर दत्त, वीर दत्त, आर्ततम, सुर्तन इत्यादी भारतवंशी राजांची नावे आहेत.

इतिहासतज्ञ हडन-वान लुशनचाइल्डच्या मते, मितानी लोक कॉकेशियस पर्वत ओलांडून भारतातून तेथे आले आणि मितानी राज्य प्रस्थापित केले. मितानी भाषेत संस्कृत आणि प्राकृत भाषांतील शब्दांची रेलचेल आहे.

– आचार्य श्रीराम शर्मा (संस्थापक, गायत्री परिवार)

 

४. बेबीलोनिया (ख्रिस्ताब्द पूर्व २००० ते ४०० वर्षे)

सुमेर संस्कृतीच्या पतनानंतर या क्षेत्रामध्ये बाबुली किंवा बेबीलोन संस्कृती वाढली. अक्कादियन साम्राज्याची राजधानी बेबीलोन होती. तेथील प्रसिद्ध सम्राट हम्मुराबी (हाबुचन्द्र) याने कायदा आणि दंडसंहिता बनवली. बेबीलोन संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य हम्मुराबीची दंडसंहिताच आहे. बेबीलोन संस्कृतीचा प्रमुख ग्रंथ ‘गिल्गामेश महाकाव्य’ होते.

येथील लोकही हिंदूंप्रमाणेच प्रात: आणि सायं अर्ध्य, धूप, अभ्यंग, दीप, नेवैद्य इत्यादी समवेत पूजा करत होते. ख्रिस्ताब्द पूर्व १८ व्या शतकात तेथील कसाइट राजांची नावे वैदिक देवता सूर्य, अग्नि, मरुत इत्यादी नावांशी मिळतीजुळती आहेत. तेथील हिट्टाइट आणि मितानी राजांमध्ये झालेल्या संधीच्या साक्षीदाराच्या रूपामध्ये इंद्र, वरुण मित्र यांची नावे सापडतात. अलअपरनामध्येे सापडलेल्या शिलालेखांमध्ये सिरीया आणि पॅलेस्टाईन यांच्या राजांची नावे भारतीय राजांसारखीच जुळतात. असीरिया शब्द असूरचे विद्रूप रूप आहे. बेबीलोनच्या प्राचीन गुहांमध्ये पुरातत्व शोधात जी भित्तीचित्रे सापडतात, त्यात भगवान शिवाचे चित्र आहे आणि अन्य हिंदु देवदेवतांची उपासना करत असलेली कोरीव शिल्पे साकारण्यात आली आहेत.

– डॉ. सुभाष कौशिक, एम्.ए (हिंदी, इतिहास) बी.एड्, पी.एच्.डी., साहाय्यक संचालक-राजस्थान प्राथमिक शिक्षण परिषद, जयपूर

 

५. असीरिया (ख्रिस्ताब्द पूर्व १४५०-५०० वर्षे)

५ अ. असीरियाला पूर्वी ‘अश्शूर’ असे म्हटले जात होते. अश्शूर प्राचीन मेसोपोटामियाचे एक साम्राज्य होते.

५ आ. असीरिया निवासी सूर्यपूजक होते आणि तेथील राजे स्वतःला सूर्यवंशी समजत होते.

अथर्ववेदचा पुष्कळसा भाग असीरियामध्ये प्रचलित होता. ज्यामध्ये यज्ञ, वशीकरण, भूतविद्या इत्यादी अंतर्भूत होते. आयुर्वेद विशेष करून चरक संहिताही असीरियामध्ये लोकप्रिय होती. तेथील लोकांची चिकित्सा आयुर्वेद पद्धतीनेच केली जात होती.

– डॉ. सुभाष कौशिक, एम्.ए (हिंदी, इतिहास) बी.एड्, पी.एच्.डी., साहाय्यक संचालक-राजस्थान प्राथमिक शिक्षण परिषद, जयपूर

५ इ. असीरियाचे क्षत्रिय राजा

एशिया माइनरच्या याच प्रदेशात एक आणखी पुरातन वंशाचे विवरण सापडते, ज्याला ‘खती’ असे म्हटले जाते. हे ‘खत्री’ किंवा ‘क्षत्री’ शब्दाचा अपभ्रंश आहे. या लोकांची प्रथम राजधानी ‘तलहलफ’ होती. या क्षत्रिय राजांचे छाप असलेली जी नाणी मिळाली आहेत, त्यावर सिंहारूढ दुर्गा आणि वृषभारूढ शिव यांच्या आकृत्या आहेत. या खोदकामात शिव-पार्वती आणि त्यांचे पुत्र कार्तिकेय यांची एकत्र प्रतिमा मिळाली आहे. ‘इकोनियम’ मध्ये मिळालेल्या शिलालेखातून त्या प्रदेशात वर्णव्यवस्था प्रचलित होती आणि संस्कृत भाषेचा प्रचार असल्याचे सिद्ध होते.

ख्रिस्ताब्दच्या १६४६ वर्ष पूर्वीपासून ११८० वर्ष पूर्वी ६०० वर्षांपर्यंत एशिया माइनर क्षेत्रात क्षत्री राजांचे राज्य राहिले होते. मितानी आणि बेबीलोन यांच्यामध्ये जागरस प्रदेशात याच लोकांचे शासन होते. यांना ‘कस्तार’ म्हटले जात होते, जो क्षत्र शब्दाचाच अपभ्रंश आहे. असीरियामध्ये मिळालेल्या एका लेखात एक क्षत्री राजा अंजु किंवा अंशु याचा उल्लेख आहे. हे क्षेत्र इराणच्या जवळ आहे. त्यामुळे तेथील भाषा आणि सभ्यता यांचाही या क्षत्र किंवा क्षत्री लोकांवर प्रभाव होता; मात्र बहुसंख्य लोक भारतीयच होते. ते लोक भारतातूनच गेले होते.

–  आचार्य श्रीराम शर्मा (संस्थापक, गायत्री परिवार)
(संदर्भ : पाथेय कण, १ जून २०१८)

Leave a Comment