श्रीलंकेतील बौद्धांनी हिंदु मंदिरांवर केलेल्या आक्रमणांचे एक उदाहरण – श्रीलंकेतील कॅन्डी शहरातील बौद्ध मंदिर !

Article also available in :

‘दलिदा मलिगावा’ नावाचे बौद्ध मंदिर

१. कॅन्डी शहर हे बौद्ध धर्मियांच्या दृष्टीने श्रीलंकेतील सर्वांत महत्त्वपूर्ण स्थान असणे

बुद्ध येऊन गेल्याची मान्यता असणारे श्रीलंकेतील कॅन्डी शहरात असलेले ‘दलिदा मलिगावा’ नावाचे बौद्ध मंदिर

‘जानेवारी २०१८ मध्ये आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत श्रीलंका दौर्‍यावर असतांना कॅन्डी शहरात गेलो होतो. कॅन्डी शहर हे बौद्ध धर्माच्या दृष्टीने श्रीलंकेतील सर्वांत महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे सांगितले जाते, ‘या ठिकाणी बुद्ध येऊन गेले आणि त्यांचा दात या शहरातील ‘दलिदा मलिगावा’ या बौद्ध मंदिरात आहे.’ ‘दलिदा’ म्हणजे दात आणि ‘मलिगावा’ म्हणजे मंदिर.

२. ‘दलिदा मलिगावा’ या बौद्ध मंदिराची शैली, दगडावर कोरलेले शिल्प
हिंदु मंदिरांच्या शैलीप्रमाणे असल्याने ‘हे मूळ हिंदूंचे मंदिर आहे’, असे वाटणे

आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत ‘दलिदा मलिगावा’ हे मंदिर पहायला गेलो होतो. ‘हे बौद्ध मंदिर आहे’, असे म्हणतात; पण ‘त्या मंदिराची शैली, आतील खांब, दगडावर कोरलेले शिल्प’, हे सर्व पाहिल्यावर ‘हे हिंदूंचे मंदिर आहे’, असे लक्षात येते. या मंदिराच्या आत चित्रे रेखाटलेली आहेत. त्या मंदिराच्या सभोवती असलेली चित्रे पाहिल्यावर वाटते, ‘आधी तिथे हिंदु देवतांची शिल्पे होती. बौद्धांनी आक्रमण केल्यावर त्यांनी मंदिर कह्यात घेतले आणि ‘तिथेे बुद्धांचे स्थान आहे’, असा खोटा प्रचार केला असावा.’

 

‘दलिदा मलिगावा’ या बौद्धमंदिरातील खांबावर हिंदु मंदिरांतील शैलीप्रमाणे कोरलेली नक्षी !

३. बौद्ध मंदिराच्या आवारातील श्रीविष्णूच्या मंदिराविषयी लोकांना ठाऊक नसणे

बौद्ध मंदिराच्या आवारात श्रीविष्णूचे मंदिर आहे. त्या मंदिरात जायची कुणाला अनुमती नाही. लोकांना त्या मंदिराविषयी काही ठाऊक नाही. त्या मंदिराच्या गर्भगृहासमोर पडदा लावला आहे. मंदिर उघडे नसल्याने कुणालाही ‘मंदिराच्या आत काय आहे ?’, हे पहाता येत नाही.

४. बौद्ध धर्मगुरूंनी इतिहासाचे विकृतीकरण करणे

बौद्ध ज्या ज्या ठिकाणी गेले, तेथे हिंदु धर्मस्थळांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे करून ‘ही हिंदूंची नव्हे, तर बौद्धांचीच स्थाने आहेत’, असे सांगून बौद्ध धर्मगुरूंनी इतिहासाचे विकृतीकरण केल्याचे यातून दिसून येते.

५. बौद्ध मंदिराच्या आवारात असलेले संग्रहालय !

कॅन्डी शहरातील या बौद्ध मंदिराच्या मागच्या बाजूला एक संग्रहालय आहे. १७ बौद्ध देशांनी या संग्रहालयासाठी त्यांच्या देशातील वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू आणि प्रतिकृती (रेप्लिकाज) दिल्या आहेत. या संग्रहालयात भारताचे सर्वांत मोठे दालन आहे.

६. अन्य देशांची आक्रमकता आणि भारताची सहिष्णुता !

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांतील बौद्ध स्थानांचा तेथील मुसलमानांनी विध्वंस केला आहे. भारत हा एकमेव असा देश आहे की, येथील सरकार बौद्ध स्थानांना जतन करण्याचा प्रयत्न करते आणि बौद्धांना पुष्कळ मान देते. भारत सरकारने बौद्ध धर्मियांना भारतातील बौद्धस्थाने पहाण्यासाठी एका स्वतंत्र आगगाडीची व्यवस्थाही केली आहे.’

 

बौद्धांची हिंदु मंदिरांच्या संदर्भात मानसिकता !

‘आम्ही श्रीविष्णूच्या मंदिरात जात असतांना मार्गदर्शक (गाईड) आम्हाला म्हणाला, ‘‘बुद्ध मंदिरात तुम्ही चपला घालू शकत नाही; पण विष्णु मंदिरात तुम्ही चपला घालून जाऊ शकता.’’ – श्री. विनायक शानभाग

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

भारत सरकारने कोट्यवधी रुपयांचा व्यय करून बौद्ध मंदिराच्या दालनात ठेवण्यासाठी बौद्ध धर्मासाठीच्या विशेष प्रतिकृती दिल्या आहेत. याउलट आपल्या देशात हिंदु धर्मासाठी सरकार असे करतांना कुठे दिसून येत नाही.

(‘बौद्ध पंथ ही उपासनापद्धत असून ती हिंदु धर्माचेच एक अंग आहे’, असा भारतियांचा दृष्टीकोन आहे. श्रीलंकेत मात्र बौद्ध पंथीय हिंदु धर्मावरच आक्रमण करत आहेत. ‘या संदर्भातील वस्तूस्थिती समाजाला कळावी’, या हेतूने हा लेख प्रसिद्ध करत आहोत. ‘या लेखातील परिस्थिती भारतीय बौद्ध पंथीय यांच्याशी संबंधित नाही.’ – संपादक)

Leave a Comment