५१ शक्तीपिठांपैकी एक असलेले बांगलादेशच्या सीताकुंड गावातील (जि. चितगाव) भवानीदेवीचे मंदिर !

सीताकुंड येथील भवानीदेवीच्या मंदिरात देवीला भावपूर्ण ओवाळतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

देवीची ५१ शक्तीपीठे ही भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथे आहेत. बांगलादेशात एकूण ६ शक्तीपीठे आहेत. ती पुढीलप्रमाणे

 

१. श्रीशैल – देवी महालक्ष्मी

बांगलादेशच्या सिल्हेट जिल्ह्यात उत्तर-पूर्वेला जैनपूर गाव आहे. या गावाजवळ ‘श्रीशैल’ नावाचे स्थान असून येथे देवी सतीचा गळा पडला होता. येथील शक्तीला ‘महालक्ष्मी’, तर भैरवाला ‘शम्बरानंद’ म्हटले जाते.

 

२. करतोयातट – देवी अपर्णा

बांगलादेशातील बोगरा जिल्ह्यात असलेला शेरपूर उपजिल्हा ! येथील भवानीपूर गावाजवळ करतोयातट या ठिकाणी असलेले मंदिर ‘देवी अपर्णा’ या नावाने सुप्रसिद्ध आहे. हे शक्तीपीठ असून येथे देवी सतीच्या डाव्या पायातील दागिना पडला होता. येथील भैरवाला ‘वामन’ म्हटले जाते.

 

३. यशोर – यशोरेश्‍वरी

बांगलादेशच्या खुलना जिल्ह्यात ईश्‍वरीपूर हे गाव आहे. येथे ‘यशोर’ नामक स्थानावर देवी सतीचे हाथ आणि पाय पडले होते. येथील शक्तीला ‘यशोरेश्‍वरी’, तर भैरवाला ‘चण्ड’ म्हटले जाते.

 

४. सीताकुंड – भवानी

बांगलादेशच्या चितगाव जिल्ह्यात वसलेल्या सीताकुंड या गावी देवीचे शक्तीपीठ आहे. या शक्तीला ‘भवानी’ म्हटले जाते. (याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.)

 

५. जयंतीया – जयंती

बांगलादेशच्या सिल्हेट जिल्ह्यात  जयंतीया क्षेत्रातील भोरभोग गावात कालाजोरच्या खासी पर्वतावर एक शक्तीपीठ आहे. येथे देवीची डावी मांडी पडली होती. येथील शक्तीला ‘जयंती’ नावाने ओळखले जाते, तर भैरवाला ‘क्रमदीश्‍वर’ म्हटले जाते.

 

६. शिकारपूर – सुनन्दा

बांगलादेशातील बारिसल जिल्ह्यात वसलेले शिकारपूर हे गाव ‘सोंडा’ नामक नदीच्या तटावर वसलेले आहे. येथे असलेले देवीचे मंदिर हे शक्तीपीठ असून येथील शक्तीला ‘माता सुनन्दा’ या नावाने ओळखले जाते. येथे देवीचे नाक पडले होते. येथील भैरव ‘त्र्यंबक’ या नावाने प्रसिद्ध आहे.

(संदर्भ : संकेतस्थळ)

 

सीताकुंड येथील भवानीदेवीचे मंदिर !

चितगाव जिल्ह्यात निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ‘सीताकुंड’ या गावात ‘एक शक्तीपीठ आहे. येथील दुर्गादेवीला ‘भवानी देवी’ या नावाने ओळखले जाते. सीताकुंड या ठिकाणी सतीचा उजवा हात पडला होता.

येथील डोंगर ‘चंद्रनाथ’ या नावाने ओळखला जात असून त्याची उंची १ सहस्र २० फूट आहे. याचे मंदिर डोंगरावर आहे. ‘चंद्रशेखर’ हे शिवाचे भैरव रूप असून तो शक्तीपिठाचे रक्षण करतो.

(संदर्भ : संकेतस्थळ)

 

हिंदूंमधील अज्ञानाचे उदाहरण !

बांगलादेशातील हिंदूंचे दुर्दैव असे की, त्यांना शक्तीपिठाचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे अनेक हिंदू हे भवानीदेवीचे दर्शन न घेता डोंगरावर असलेल्या चंद्रशेखराचे दर्शन घेण्यास प्राधान्य देतात.

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ भारत तसेच विदेशात भ्रमण करून प्राचीन वास्तू आदींच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. आपल्याला यांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !

 

Leave a Comment