मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !

Article also available in :

प्राचीन काळात ज्याला ‘मलय द्वीप’ म्हणत होते, ते म्हणजे आताचा मलेशिया देश. ‘मलय द्वीप’ म्हणजे अनेक द्विपांचा समुच्चय आहे. पुढे या द्विपाला ‘मेलका’, असे म्हणत असत. मलय भाषेत अनेक संस्कृत शब्दांचा उपयोग केला जातो. मलय भाषेच्या साहित्यामध्ये ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचा संबंध दिसून येतो. १५ व्या शतकापर्यंत, म्हणजे मलेशियात ‘इस्लाम’ येईपर्यंत ‘मजापाहित’, ‘अयुद्धया’ आणि ‘श्रीविजय’ या हिंदु साम्राज्यांनी १ सहस्र ५०० वर्षे राज्य केले. २ सहस्र वर्षांपूर्वी मलेशियाच्या इतिहासाविषयी कुठेही विशेष उल्लेख आढळत नाही.

डावीकडून श्री. सत्यकाम कणगलेकर, श्री. पूगळेंदी सेंथियप्पन्, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. स्नेहल राऊत आणि श्री. विनायक शानभाग

१. मलेशियाचा राजा – यंग दी पेर्तुआन अगोंग

‘याचा शब्दशः अर्थ ‘ज्याला प्रभु बनवला गेला असा’, हा आहे. हा मलेशियाचा राजा अन् राष्ट्रप्रमुख आहे. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर वर्ष १९५७ मध्ये ‘फेडरेशन ऑफ मलय’च्या (आताच्या मलेशियाच्या) कार्यालयाची स्थापना झाली. मलेशिया या देशात संवैधानिक राजेशाही असून तेथे निवडून आलेला राजा हा राष्ट्राचा प्रमुखही आहे. ‘यंग दी पेर्तुआन अगोंग’ हा जगातील निवडून आलेल्या काही राजांपैकी एक आहे. ७ व्या शतकात श्रीविजय आणि अयुत्थय यांचे राज्य होते. तेव्हापासून राजाला निवडून देण्याची संकल्पना चालू झाली. त्या काळी श्रीविजय यांच्या राज्यातील विविध नगरांतून (राज्यांतून) राजा निवडला जात असे. राजाच्या पत्नीला ‘राजा परमैसुरी अगोंग’, असे म्हणतात.

२. दक्षिण-पूर्व आशियायी देशांच्या भारतीयीकरणामुळे भारतीय मानदंडांचा
मलय, थाय, फिलिपीन्स आणि इंडोनेशियन मानदंडांवर प्रभाव असल्याचे दिसून येणे

ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दक्षिण-पूर्व आशिया भागावर प्राचीन भारतीय संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपीन्स, कंबोडिया, व्हिएतनाम यांसारखी असंख्य अधिराज्ये समृद्ध झाली (भरभराटीस आली). या भागांवरील भारतीय संस्कृतीच्या प्रभावाला ‘भारतीयीकरण’ (इंडियनाइझेशन) अशी संज्ञा वापरली गेली.

फ्रेंच पुरातत्त्वे शास्त्रज्ञ जॉर्ज कोडेस यांनी याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे, ‘भारतीयीकरण’ म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था, हिंदु धर्म, बौद्ध पंथ आणि संस्कृत भाषा यांवर आधारित असलेल्या संघटित संस्कृतीचे विस्तारीकरण.’ दक्षिण-पूर्व आशियाचे भारतीयीकरण आणि तेथील हिंदु धर्म अन् बौद्ध पंथ यांचा प्रसार यांतून त्याची व्याप्ती लक्षात येते. मूळ भारतीय; परंतु अनिवासी प्राचीन आणि वर्तमान भारतीय समाजाने व्यावसायिक, व्यापारी, पुरोहित आणि योद्धे म्हणून नेहमीच येथे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय मानदंडांचा मलय, थाय, फिलिपीन्स आणि इंडोनेशियन मानदंडांवर प्रभाव असल्याचे दिसून येते.

३. मलय भाषेवरील संस्कृत भाषेचा प्रभाव

मलेशियाच्या राष्ट्रप्रमुखाला मलय भाषेत ‘दुली यांग महा मुलिय सेरी पादुका बगिंडा यंग दी पेर्तुआन अगोंग’, असे म्हणतात. यातील ‘यंग दी पेर्तुआन अगोंग’ या शब्दाचा अर्थ ‘मलेशियाचा प्रमुख’ असा आहे.

‘दुली यांग महा मुलिय सेरी पादुका बगिंडा यंग दी पेर्तुआन अगोंग’ याचा अर्थ आहे, ‘महान श्रेष्ठ योग्यताप्राप्त अशा माझ्या स्वामी असलेल्या राजाच्या श्री पादुकांची मी धूळ आहे.’

रामायणात रामाच्या प्रतिनिधित्वाचे दर्शक म्हणून भरताने रामाच्या पादुका त्याच्या राजसिंहासनावर ठेवून त्याच्या आज्ञेने तो वनवासातून येईपर्यंत राज्यकारभार पाहिला. रामायणातील या घटनेचा वरील मलय भाषेतील वाक्यांशी संबंध दिसून येतो.

३ अ. संस्कृतोद्भव शब्द (संस्कृत भाषेतून आलेले शब्द)

३ आ. परमेश्‍वर

मलेशिया येथील एका राजाचे नाव ‘परमेश्‍वर’ होते. ‘सुमा ओरिएंटल’ या पोर्तुगीज पुस्तकात ‘परमेश्‍वर’ या नावाचा उल्लेख ‘परमीसुरा’ किंवा ‘परीमीसुरा’ असा केलेला आढळतो. ‘परमेश्‍वर’ हा मूळ संस्कृत शब्द आहे. तमिळ आणि इतर दक्षिण भारतीय भाषांत भगवान शिवाला ‘परमेश्‍वर’ म्हणतात. हिंदु धर्मानुसार ‘परमेश्‍वर’ या शब्दाचा अर्थ आहे, ‘सर्वोच्च देव’ (परम = सर्वोच्च आणि ईश्‍वर = देव). तमिळ भाषेत भगवान शिवाचे एक नाव ‘परमेश्‍वर’ आहे.

३ इ. ‘मेलाका’ हे राज्याचे नाव संस्कृत शब्द ‘अमलका (आवळा)’ या वृक्षावरून आलेले असणे

‘अमलका (आवळा)’ हा वृक्ष या विश्‍वाच्या उत्पत्तीच्या वेळी सर्वप्रथम निर्माण केला गेलेला आहे’, असे मानले जाते. हा वृक्ष संपत्ती, आरोग्य आणि शक्ती यांच्याशी निगडित आहे. त्याचप्रमाणे ‘या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आलेल्या हिंदु व्यापार्‍यांना हे राज्य संपत्ती, आरोग्य आणि शक्ती यांच्याशी निगडित आहे’, असे वाटल्यामुळे त्यांनी त्या राज्याला ‘अमलका’ या वृक्षाएवढेच महत्त्व दिलेे आणि त्याला ‘अमलका’ म्हणतांना पुढे अपभ्रंश होऊन ‘मेलाका’ झाले असावे.

४. मलेशियावर राज्य करणार्‍या प्राचीन राजांची नावे (टीप १)

संस्कृत आणि तमिळ या भाषांच्या प्रभावामुळे सिंगापूर अन् मलेशिया मधील ‘मलय’ राजवटीत ‘राजा’ ही संकल्पना रुजलेली होती. मलेशियावर राज्य करायला आलेल्या प्रथम मलय राजापासून ते ७०० वर्षांपर्यंतच्या मलय राजांचा इतिहास डॉ. आगुस सलीम यांनी लिहिलेल्या ‘स्टोरी ऑफ सिंगापूर मलय रूलर्स’ या पुस्तकात आहे.

टीप १ – सिंगापूरवर राज्य करणार्‍या राजांची कारकीर्द डॉ. आगुस सलीम यांनी केलेल्या संशोधनातून घेतली आहे. (‘द किंग ऑफ १४ सेंचुरी सिंगापूर, जेएम्बीआर्एएस् २० (२))

टीप २ – ‘स्त्री त्रिभुवन’ याचा अर्थ आहे, ‘स्त्री = श्री, त्रि = तीन, भुवन = लोक.’

५. मलेशियाच्या राजाचे निवासस्थान

‘इस्ताना नेगरा’ हे यंग दी पेर्तुआन अगोंग यांचे (मलेशियाच्या राजाचे) अधिकृत निवासस्थान

‘इस्ताना नेगरा’ हे यंग दी पेर्तुआन अगोंग यांचे (मलेशियाच्या राजाचे) अधिकृत निवासस्थान आहे. ‘इस्ताना नेगरा’ हे मूळ संस्कृत भाषेतील आहे. संस्कृतमध्ये ‘नगर स्थानम्’ असे होते.

यंग दी पेर्तुआन अगोंग आणि त्याची पत्नी राजा परमैसुरी अगोंग यांचे सिंहासन (सिंह + आसन = सिंहासन)

भगवान विष्णूच्या नरसिंहावताराचा अंश सोनेरी आहे, तसेच सोनेरी रंग शाही आहे.

६. शाही प्रतिके

मलेशियाच्या शाही प्रतिकांपैकी एक असलेल्या अणकुचीदार गदेचे निरनिराळे प्रकार आणि त्यासमवेत अन्य शस्त्रे

राजा किंवा सुलतान यांच्यासाठी वापरण्यात येणारी छत्री. (त्यावरील नक्षी गोलात मोठी करून दाखवली आहे.)

६ अ. पिवळी छत्री

राजा किंवा सुलतान यांच्यासाठी पिवळ्या रंगाची छत्री

६ आ. गदा

‘गदा’ हा मूळ संस्कृत शब्द असून तमिळमध्ये त्याला ‘गदाइ’, मलयमध्ये ‘गेदक’, जुन्या टॅगलॉग भाषेत ‘बतुता’ असे म्हटले जाते. हे आयुध लाकूड किंवा धातू यांपासून बनवले जात असून ते दक्षिण आशियाचे आहे. गदा म्हणजे एका दांड्याला गोलाकारातील शिर असून त्यावर अणकुचीदार टोक असते. भारताबाहेरील दक्षिण-पूर्व आशियाने ‘गदा’ स्वीकारली आहे. ‘सिलट’ या ‘मार्शल आर्ट्स’च्या (स्वसंरक्षणाच्या) प्रकारामध्ये तिचा उपयोग केला जातो.

‘गदा’ हे हिंदु देवता हनुमंताचे प्रमुख आयुध आहे. शक्ती अन् सामर्थ्य यांसाठी ओळखल्या जाणार्‍या हनुमंताची पूजा दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामधील कुस्तीपटू करतात. चतुर्भुज भगवान विष्णूच्या एका हातात ‘कौमोदकी’ (कौमुदी) नावाची गदा आहे. महाभारतात भीम, दुर्योधन, जरासंध यांसारखे योद्धे ‘गदेचे स्वामी’ म्हणून ओळखले जातात.’

– श्री. पूगळेंदी सेंथियप्पन्, मलेशिया

Leave a Comment