मोक्षमार्गातील शिकवणारे विविध टप्पे

साधक, शिष्य, संत, गुरु आणि सद्गुरु हे सर्व जण मोक्षप्राप्तीच्या ध्येयातील आपल्याला शिकवणारे टप्पे आहेत. आपल्या साधनाप्रवासात ते विविध टप्प्यांना आपल्या संपर्कात येतात; पण आपले मुख्य ध्येय मात्र ईश्‍वरप्राप्तीच आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अध्यात्माची चालती-बोलती शाळा !

‘आपल्या समवेत असलेला सहसाधक म्हणजे त्याच्याकडून शिकण्याची देवाने दिलेली एक संधी आहे’, असे समजावे. बर्‍याचदा तो साधकच आपला गुरु बनतो. त्याच्याकडून शिकण्यासारखे अनेक गुण देव आपल्याला लक्षात आणून देतो. आपण आपल्या सहसाधकाकडे त्याच भावाने पहावे. देवाने एखाद्या साधकाला आपल्या संपर्कात पाठवले आहे, तर प्रसंगी त्याच्या साधनेचे संपूर्ण दायित्वही आपल्याला घेता आले पाहिजे. ‘आपणच एकमेकांचे उत्तरदायी … Read more

देवाला स्मरून केलेली प्रत्येक उत्तम कृती, म्हणजे परिपूर्ण सेवा असते आणि परिपूर्ण सेवेतूनच साधनेची अधिक फलनिष्पत्ती प्राप्त होते !

साधकांनी सेवा करून उत्तरदायी साधकांचे मन जिंकायला हवे. उत्तरदायी साधकांनी पुन्हा सेवा देतांना म्हटले पाहिजे, ‘‘अरे, हा साधक ना ! पुष्कळ चांगली सेवा करतो. त्याने केलेली सेवा मला परत पहावी लागत नाही.’’ अशा प्रकारे उत्तरदायी साधकांनी आपल्याला १०० टक्के गुण देऊन सेवारूपी परीक्षेत उत्तीर्ण केले पाहिजे. सेवेतील फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी दुसर्‍या दिवसाच्या सेवेचे ध्येय आदल्या दिवशीच … Read more

परिपूर्ण सेवेचा ध्यास कसा असावा ?

‘साधकांनी एखादी कृती केली आणि अमूक इतके घंटे सेवा झाली, म्हणजे सेवा झाली’, असे होत नाही. हे काम झाले. तेव्हा साधक ‘मी साधना केली किंवा सेवा केली’, असे म्हणू शकत नाही. सेवा करण्याचा ध्यासच लागायला हवा. ‘एखादी कृती केल्यावर त्या माध्यमातून माझी साधना झाली का ?’, याचे सतत चिंतन करायला हवे. असे चिंतन करण्याची स्वतःला … Read more

गुरूंचे एखाद्या व्यक्तीविषयीचे बोल त्याच्या अंतर्मनात चालू असणार्‍या ईश्वरप्राप्तीच्या तळमळीला उद्देशून असतात !

गुरु नेहमीच एखाद्या प्रकृतीकडे पहातांना त्याच्या बाह्य वैगुण्याकडे पहात नाहीत, तर त्या व्यक्तीत असणार्‍या ईश्वरप्राप्तीच्या धडपडीकडे त्यांचे लक्ष असते. गुरूंचे त्या व्यक्तीविषयीचे बोल, हे नेहमी त्याच्या अंतर्मनात चालू असणार्‍या ईश्वरप्राप्तीच्या तळमळीला उद्देशून असतात. तेव्हा गुरूंच्या त्या व्यक्तीविषयींच्या बोलांचा अर्थ समजून घेतल्यास आपल्या मनात गुरूंविषयी विकल्प येत नाहीत. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

छायाचित्रे चांगली दिसण्यासाठी त्यांत पुष्कळ पालट केले, तर त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते !

अनेक वेळा आपण ‘छायाचित्रे चांगली दिसावीत’, यासाठी त्यात पालट करत असतो. छायाचित्रांत पुष्कळ पालट केल्यास त्यांतील नैसर्गिकतेत पालट होईल आणि छायाचित्र कृत्रिम वाटू लागेल. छायाचित्रातील अनैसर्गिकतेमुळे त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

कुठलीही गोष्ट करतांना त्यामागील शास्त्र किंवा उद्देश समजून केली, तर कृती करण्यातील आनंद मिळण्याचे प्रमाण वाढते !

ईश्वरी ज्ञान ग्रहण करत असतांना प्रत्येक वेळी आपल्या ज्ञानात भर पडत असल्याने आपला आनंद द्विगुणित होत असतो. ज्ञानामुळे आपल्याला सेवा करतांना आनंद मिळतो. असे प्रत्येक गोष्टीचेच आहे. कुठलीही गोष्ट करतांना त्यामागील शास्त्र किंवा उद्देश समजून केली, तर कृती करण्यातील आनंद मिळण्याचे प्रमाण वाढते. कुठलीही गोष्ट समजून करावी. अंधतेने करू नये. अंधतेने केलेल्या गोष्टीतून ताणच निर्माण … Read more

साधनेतील आत्मपरीक्षणचे महत्त्व

आपल्या हातून घडणार्‍या पाप आणि पुण्य याची नोंद प्रतिदिन ठेवणे, म्हणजे साधना. असे केले, तर आपलेच आपल्या कर्माकडे लक्ष रहाते. आपणच आपले परीक्षण केले, तर आपली साधनेत प्रगती लवकर होते. शिवाय यातून स्वतःकडे साक्षीभावानेही पहाता आल्याने आपल्याला अध्यात्मात थेट पुढच्या टप्प्यालाच जाणे शक्य होते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

संत दुसर्‍यांच्या जीवनाला आनंदयात्रा बनवतात

इतरांच्या आनंदात एकरूप होऊन आपल्या समवेत इतरांच्याही जीवनाला आनंदयात्रा बनवता आले पाहिजे. संत असे असतात. ते दुसर्‍यांच्या जीवनाला आनंदयात्रा बनवतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ