वयोमानानुसार सुखाच्या संदर्भातील विचारसरणीमध्ये होणारा पालट

‘व्यक्ती तरुणपणात विचार करते की, ‘बरे झाले, आपण अजून तरुण आहोत. विविध प्रकारचे सुख अनुभवता येईल.’ हीच व्यक्ती पुढे म्हातारपणी विचार करते की, ‘बरे झाले, आता काही करता येत नाही. आपल्याला या मायेतून लवकर सुटता येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, अशी स्थिती असण्यापेक्षा ‘तुम्ही राजा व्हा, तुम्ही कारभार करा !’, अशी स्थिती निर्माण होणे आवश्यक !

‘वेदांमध्ये म्हटले आहे, ‘हे इंद्रा, तू सर्वार्थांनी लायक आहेस. तू राजा हो.’ असे लोकांनी राजासाठी म्हणायला पाहिजे; परंतु भारतात मात्र ‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, असे शब्द ऐकू येतात.’ – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

समष्टी मौन

‘अनावश्यक न बोलणे, म्हणजे खर्‍या अर्थाने समष्टी मौन !’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ

आधुनिक संगीताची शोकांतिका

आताचे आधुनिक संगीत म्हणजे माणूस हरवलेले संगीत आहे. ज्यात माणसासारखा जिवंतपणाच नाही, तेथे देव कुठून येणार ? श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

छायाचित्रे चांगली दिसण्यासाठी त्यांत पुष्कळ पालट केले, तर त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते !

अनेक वेळा आपण ‘छायाचित्रे चांगली दिसावीत’, यासाठी त्यात पालट करत असतो. छायाचित्रांत पुष्कळ पालट केल्यास त्यांतील नैसर्गिकतेत पालट होईल आणि छायाचित्र कृत्रिम वाटू लागेल. छायाचित्रातील अनैसर्गिकतेमुळे त्यातील जिवंतपणा हरपतो आणि चैतन्य न्यून होते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

खरे सौंदर्य

आहारात सात्त्विकता असायला हवी. जसा आहार, तसा विचार, तसे देहाचे सौंदर्य ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

शिक्षणासोबतच वैयक्तिक गुणांनाही नोकरीत महत्त्व !

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

स्त्रियांनी अंतर्मुख होणे आवश्यक !

‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्‍या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्‍या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्‍या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी आणि कुंडलिनी शक्ती !

साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्‍वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले