चित्रकारांनो, आपण कोणासाठी चित्र काढत आहोत, हे लक्षात घेऊन चित्र काढा !

‘चित्र काढतांना ते दुसर्‍यासाठी असल्यास त्यांच्या आवडी लक्षात घेऊन ते काढा. चित्र साधकांसाठी असल्यास त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यातून चैतन्याची अनुभूती येणे आवश्यक असते, तर चित्र इतरांसाठी असल्यास त्यांच्या सुखासाठी ते डोळ्यांनी चांगले दिसणे आवश्यक असते.’

प्रारब्ध भोगणे आणि प्रारब्ध जळणे यांतील भेद

‘प्रारब्ध भोगणे : त्रास सहन करणे प्रारब्ध जळणे : त्रासाचे काही न वाटणे’ शिकण्यात लहान मुले मोठ्यांपेक्षा हुशार ! ‘लहान मुले आई-वडिलांकडून २ – ३ वर्षांतच मातृभाषा बोलायला शिकतात; पण मोठ्यांना दुसरी भाषा बोलायला शिकायला काही वर्षे द्यावी लागतात !’

गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व

साधना करतांना गुरूंच्या आज्ञेने सर्व करत गेल्यास स्वतःचे मन आणि बुद्धी यांचा वापर न झाल्याने त्यांचा लय होतो. मनोलय आणि बुद्धीलय होतो. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत याला Disuse Atrophy (वापर न केल्यामुळे होणारा नाश) असे म्हणता येईल. यावरून गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येईल.

कुठे काही वर्षांतच विसरले जाणारे मायेतील विषय, तर कुठे युगानुयुगे अभ्यासले जाणारे अध्यात्मातील ग्रंथ !

‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कोणाला ज्ञात नसतात. याउलट अध्यात्मातील इतिहास आणि ग्रंथ युगानुयुगे मानवाला ज्ञात असतात; कारण ते मार्गदर्शन करतात !’

साधना करण्यासंदर्भातील स्वेच्छा ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असणे !

साधनेत सांगतात, स्वेच्छा नको. प्रथम सर्व परेच्छेने करण्यास शिका. नंतर ईश्‍वरेच्छा काय आहे ते कळेल आणि त्यानुसार सर्व करा. असे जरी असले, तरी साधना करण्यासाठी नोकरीच काय, तर घरदारही सोडण्याचा विचार करण्याची स्वेच्छा झाली, तरी ती योग्यच आहे. ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.११.२०१६)

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता…

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता यायला लागले की, ईश्‍वरप्राप्ती होते. याउलट व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वेच्छेने वागणारे झपाट्याने अधोगतीला जातात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१६)

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७० वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.११.२०१६)

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य…

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य बुद्धीअगम्य, म्हणजे बुद्धीपलिकडील, सूक्ष्म स्तरावरील असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणा-या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण

आध्यात्मिक पातळी अध्यात्मातील विविध पातळ्यांना होणार्‍या त्रासाचे प्रधान स्वरूप, त्रासाचे प्रमाण आणि त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रमाण : सनातनचे साधक आणि संत तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करत समष्टी साधना करत असतांना त्यांना वाईट शक्तींचा त्रास का होतो ?, असा प्रश्‍न काही जणांच्या मनात निर्माण होतो. त्याचे उत्तर पुढील तक्त्यावरून लक्षात येईल. … Read more

प्रचारात साहाय्य करणे आणि स्वतः प्रचार करणे

मी तुम्हाला प्रचारात साहाय्य करतो, यापेक्षा स्वतः प्रचार करणे, ही वरच्या स्तराची साधना आहे. याचे कारण हे की, मी तुम्हाला प्रचारात साहाय्य करतो, यात एक प्रकारे अहं असतो आणि प्रचारात काही चुका झाल्या, तर स्वतःकडे त्यांचे उत्तरदायीत्व नसते. याउलट स्वतः प्रचार करणे यात स्वतःवर असलेल्या उत्तरदायीत्वाची जाणीव असते. त्यामुळे प्रगती जलद होते. – (परात्पर गुरु) … Read more