अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे केवळ साधनेचा विचार न करता प्रत्यक्ष साधना केल्यासच मनावर साधनेचा संस्कार होणे

साधकाची जसजशी आध्यात्मिक प्रगती होते, तसतसे त्याच्या जीवनातील सर्वकाही देवाशी जोडले जाऊ लागते. ‘देव एके देव’ एवढेच शेष रहाते. बहुतेक लोक विचारांच्या पातळीला बराच काळ रहातात. त्यांच्याकडून साधनेची कृती होत नाही. केवळ साधनेचा विचार करून चालत नाही, तर त्याप्रमाणे साधना करून अध्यात्म जगावे लागते, तरच मनावर साधनेचा संस्कार होतो; म्हणूनच ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, … Read more

श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठल्याही परिस्थितीत त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करत असणे

‘तुमच्या देहाचे मडके अध्यात्मात एकदा चांगले सिद्ध झाल्यावर तुम्ही कधीही, कुठेही गेलात, तरी ते फुटत नाही; उलट ते चांगला नाद निर्माण करते. श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

वर्तमान स्थितीत भगवंताचे तत्त्व ज्या देवतेच्या रूपात समोर येईल, त्या रूपाला प्रार्थना करून त्या रूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता आल्यास सर्वव्यापी भगवंताशी एकरूप होता येणे

‘वर्तमान स्थितीत समोर येईल, त्या देवाच्या तत्त्वांशी एकरूप होता आले पाहिजे. त्या वेळी समोर दिसणार्‍या देवाच्या तत्त्वाला प्रार्थना करून त्याची सेवा करता आली पाहिजे. यामुळे ईश्वराच्या प्रत्येक तत्त्वाशी जुळवून घेता येते आणि मग सर्वव्यापी असणार्‍या भगवंताशी एकरूप होता येते. काही जणांमध्ये सांप्रदायिकतेमुळे देवाच्या एकाच तत्त्वाविषयी भाव असतो, उदा. काहींना श्रीराम जवळचा वाटतो; परंतु हनुमंत नाही. … Read more

समष्टी सेवेत सातत्य असल्यावर देवाचा आशीर्वाद आणि कृपा दोन्ही प्राप्त होणे

‘व्यष्टी साधना करतांना देवाचा आशीर्वाद मिळतो; मात्र समष्टी सेवेमध्ये असल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची कृपाही प्राप्त होते. आशीर्वाद काही काळापुरताच टिकतो; परंतु कृपा चिरंतन असते. समष्टी सेवेत सातत्य असल्यावर आशीर्वादाचे रूपांतर कृपेत होते.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे

‘समष्टी सेवेमुळे भगवंताच्या निर्गुण निराकार तत्त्वाशी शीघ्रतेने एकरूप होता येते; कारण समष्टी सेवा करतांना आपल्या इच्छा सोडून इतरांची इच्छापूर्ती होण्यासाठी जगावे लागते. यातून अहं लवकर अल्प होतो. त्यामुळे देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

नामाच्याही पुढे केवळ ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागतो आणि तेव्हा देवच भक्ताची सेवा करू लागतो

‘नामाच्याही पुढे केवळ एकच ध्यास उरतो, तो म्हणजे ईश्वरप्राप्तीचा ! ईश्वरालाच ‘ब्रह्म’, असे म्हणतात. ‘ब्रह्म’ एकच आणि अविनाशी आहे. भक्ताच्या या अवस्थेत देवच भक्ताचे नाम घेण्याचे कार्य करतो. आधी भक्त देवाची सेवा करतो आणि नंतर देवच भक्ताची सेवा करू लागतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्री गुरूंची सेवा केल्यावर संकुचित वृत्ती जाऊन व्यापकता येणे

‘भगवंत किंवा गुरु यांची सेवा करणे’, हेच आयुष्यातील आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. त्यामुळे संकुचित वृत्ती सुटते आणि समाजाच्या कल्याणाचा विचार होऊ लागतो. व्यापक संकल्पना मनात आणल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही; कारण भगवंत व्यापक आहे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

राजकारण आणि अध्यात्म यांतील भेद

१. राजकारणातील क्षणभंगुरता अ. ‘एखादी व्यक्ती सत्तेवर असतांना तिला शासनाच्या वतीने सुख-सुविधा पुरवल्या जातात. त्या व्यक्तीला पोलिसांकडून संरक्षण दिले जाते. आ. त्या व्यक्तीचा पदाचा कालावधी पूर्ण झाला की, तिला दिलेल्या सुविधा काढून घेतल्या जातात. त्या व्यक्तीवर अकस्मात् पद (सत्ता) सोडण्याची वेळ आली, तर एका रात्रीत तिच्याकडे असलेले दायित्व काढून घेतले जाते आणि दुसर्‍या व्यक्तीला दायित्व … Read more

ज्ञान आणि अज्ञान यांतील भेद

‘जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे. जे मायेत अडकवते, जे अशाश्वताविषयी सांगते आणि जे अहंकार जोपासते ते ‘अज्ञान’ आहे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१२.९.२०१७)

देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवण्याचे महत्त्व !

अ. साधकांनी ‘स्वतःकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया होत नाही’, असा विचार करत रहाण्यापेक्षा देवाशी अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘देवाशी असलेले अनुसंधानाचे विचारच साधकाला मोक्षापर्यंत नेतात; म्हणून देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवून प्रत्येक कृती करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’ आ. ‘प्रत्येक प्रसंगात समोरच्या व्यक्तीला छान (योग्य शब्दांत) उत्तर देणे’, ही … Read more