साधनेला आरंभ केल्‍यावर ईश्‍वराला जाणून घ्‍यायची जिज्ञासा असेल, तर प्रथम स्‍वतःला जाणा !

‘साधनेला आरंभ केला की, कुणालाही ईश्‍वराला पहायची, त्‍याला जाणून घ्‍यायची ओढ लागते; पण आपण स्‍वतः स्‍वभावदोष आणि अहंकार यांनी मलीन असतांना आपल्‍याला शुद्ध आणि पवित्र असा ईश्‍वर कसा भेटेल ! ईश्‍वराला जाणून घ्‍यायचे असेल, तर आधी अंतर्मुख होऊन स्‍वतःला जाणले पाहिजे. ‘आपल्‍यात कोणते स्‍वभावदोष आणि अहंचे कोणते पैलू आहेत ?, तसेच आपल्‍यात कोणते गुण वाढवणे … Read more

चरणांवर डोके टेकवतात आणि हात आशीर्वाद देतात !

‘चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत आहे. चरणांना हा मान मिळत असल्याने हातांनी चरणांना विचारले, ‘सर्व जण तुझ्याच पाया का पडतात ?’ तेव्हा चरणांनी हातांना पुढील दोन प्रकारे समजावले. १. ‘मी भूमीवर असतो; म्हणून सर्व जण माझ्यावर डोके टेकवून नमस्कार करतात. त्यासाठी तुलाही भूमीवर यावे लागेल. भूमीवर यावे लागेल, म्हणजे अहं न्यून करावा लागेल. अहं … Read more

आपला देह चैतन्याने भारित होण्यासाठी देवाचा नामजप करा !

‘भगवंत चैतन्यमय आहे. त्यामुळे देवाच्या नावातही, म्हणजे नामजपातही चैतन्य आहे. नामजप करतांना ‘प्रत्येक नामजपामुळे आपल्यामध्ये कण कण चैतन्य साठवले जात आहे’, असा भाव ठेवावा. तीच आपली खरी पुंजी आहे. प्रतिदिन आपली ही पुंजी व्यय (खर्च) होत असते. त्यामुळे आपल्याकडून अधिकाधिक नामजप व्हायला हवा. भ्रमणभाषचा विद्युतघट (बॅटरी) रिक्त झाला की, आपल्याला कळते आणि आपण त्याला भारित … Read more