भारत भूमीची महानता !

‘भारत भूमीत जन्माला येणार्‍या प्राणीमात्रांनाही जे भाग्य लाभले आहे, ते पाश्‍चात्त्य देशांतील अधिनायकांनाही लाभलेले नाही.’ – प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय वर्षीय धर्मसंघ

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

‘आपली वैदिक संस्कृती अत्यंत महान आहे. संस्कृती सोडणे म्हणजे हाताला लागलेला धनसंपत्तीचा साठा सोडण्यासारखेच आहे. वैदिक आर्य संस्कृती ही भारतियांचा आणि हिंदूंचा प्राणच होय. ती नष्ट झाल्यास हिंदु समाज मृतवत् झाल्यासारखाच होईल. वैदिक आर्य संस्कृती ही परमेश्‍वराकडून आलेली अनादी, अच्युत आणि अतिशुद्ध असून ती अनादि मानवी संस्कृतीपासून चालत आली आहे.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ … Read more

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

१. पशूला द्रव्याचा लोभ नसतो; परंतु हाच द्रव्यलोभ माणसाला पशू बनवतो. २. ‘मी देह नाही’ हे म्हणण्यापेक्षा ‘मी आत्मा आहे’ हे म्हणण्यामुळे ‘नाहमकर्ताची’ जाणीव होऊन नरदेहाचे सार्थक होते. ३. आज आपल्या देशाची उन्नती करण्याकरता सुसंस्कृत माणसांची आवश्यकता आहे. केवळ सुशिक्षित असणे व्यर्थ आहे. (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

भगवंताचे नाम

१. भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशांप्रमाणेच आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. २. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन आहे. – श्री गोंदवलेकर महाराज (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

‘परमार्थ म्हणजे परम अर्थ. श्रेष्ठ असणार्‍या ‘आत्मतत्त्वाचा आत्मलाभ’ म्हणजेच परमार्थ आहे. अत्यंत सूक्ष्म अशा जाणिवेत चिंतन असावे. त्याकरता काळ, वेळ आणि ठावठिकाणा यांची कसलीच आवश्यकता नसते. ‘अंतरी अखंड समाधान’, हीच त्याची फलश्रुती होय !’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक, ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी १९९९)

नामजप आणि यज्ञ

१. ‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे. २. काही साध्य करण्यासाठी एखाद्याला नामजप अनेक दशके करावा लागतो. याउलट यज्ञ काही सात्त्विक पुरोहितांनी काही तास किंवा दिवस केल्यास २० – २५ किलोमीटर अंतरातील सहस्रो लोकांनाही त्याचा लाभ होतो. ’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भारत देशाचे महत्व

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?

हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल. -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले