आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।

भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला … Read more

दिसेल ते कर्तव्य, भोगीन ते प्रारब्ध आणि घडेल ते कर्म.

भावार्थ : व्यवहारातील कर्म हे कर्तव्य म्हणून केले पाहिजे. त्यातील मायेत गुरफटले जाता कामा नये. ज्याच्या त्याच्या भाग्याने जे व्हायचे, तेच होते; परंतु मायेत न पडता व्यवहाराप्रमाणे आपापली पुढे येणारी कर्मे कर्तव्य म्हणून केली पाहिजेत. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

वेळ न मिळणे

जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका. भावार्थ :‘जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता’ म्हणजे पैसा गोळा करता आणि ‘जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता’ म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. ‘याउलट कसे करायचे ते … Read more

हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.

भावार्थ : ‘हे असे आहे का ?’ मधील ‘हे’ मायेविषयी आहे. ‘ते तसे आहे का ?’ मधील ‘ते’ ब्रह्मासंबंधी आहे. ‘हे असेही नाही, तसेही नाही’, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि ‘तशीही नाही’ म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ‘ते कशात नाही ?’ म्हणजे ब्रह्म सर्वत्र … Read more

सतत वर्तमानकाळात रहाणे

आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो. भावार्थ : ‘कर्म मागे’ म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करत नाही. ‘धर्म आमच्या पुढे असतो’ म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. ‘आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो’ म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)

‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’

पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ भावार्थ : ‘इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।’ म्हणजे ‘पंढरपूरला जाणार’, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्वराच्या भेटीपेक्षा … Read more

स्वतःच्या आवडीचे नाम आणि गुरूंनी दिलेले नाम

भावार्थ : स्वतःच्या आवडीचे नाम घेतांना त्यात थोडा तरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव तर नसतोच; पण त्या नामात चैतन्य असल्याने प्रगती लवकर होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

जमीनको आधार नहीं, आसमानको कबर नहीं, इन्सानको सबूर नहीं ।

भावार्थ : ‘इन्सानको सबूर नहीं’ म्हणजे व्यावहारिक अर्थाने फुरसत नाही, वेळ नाही आणि आध्यात्मिक अर्थाने आयुष्य इतके लवकर निघून जाते की, साधना करायला वेळच मिळत नाही. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

श्‍वास आणि नाम : नाम श्‍वासाला जोडणे

भावार्थ : आपण श्‍वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्‍वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्‍वासाला जोडायचे असते. श्‍वास नामाला जोडायचा नसतो. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

फकीरकी लकीर और लकीरका फकीर ।

भावार्थ : ‘फकीरकी लकीर’ म्हणजे फकीराची ललकारी, म्हणजे शिष्य. हाच पुढे ‘लकीरका फकीर’ म्हणजे ‘शिष्याचा गुरु’ होतो. लकीर (ललकारी) आणि फकीर यांच्यात जसे अद्वैत असते, तसेच पुढे गुरु-शिष्यात अद्वैत होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज