‘साधकाच्या आयुष्यात संतांचा सहवास महत्त्वाचा असतो. संत सहवासाने साधकामधील देवत्व वाढते. मनुष्याला बुद्धी असल्याने तो या सहवासाचा योग्य लाभ करून घेऊ शकतो. बर्याच वेळा त्याचा अहं त्याच्या प्रगतीच्या आड येतो. वस्तूंना मात्र भाव-भावना आणि अहं नसतो. वस्तू संतांच्या सहवासात लगेच भारित होतात आणि त्यांच्यात पालट होतांना आढळतो. संत सहवासाने साधकाचे मायेतील विचार न्यून होतात. साधकाच्या दैवी अनुसंधानात वाढ होऊ लागते. संतसहवासाने साधकाचे प्रारब्धभोग न्यून होतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !