खरे देवदर्शन !

ईश्वरप्राप्तीसाठी सतत धडपड करणार्‍या आणि खर्‍या अर्थाने हिंदू म्हणून जगणार्‍या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचून तिला भेटणे आणि साधना सांगणे, हे तिच्या दृष्टीने देवदर्शन आहे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !

‘आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न हे प्रामुख्याने मनाच्या स्तरावर करायचे असतात. त्यामुळे ते जिवंत असतांना आणि देहत्याग केल्यावरही करायचेच असतात. जिवंत असतांना मनावर साधनेचा संस्कार केला, उदा. सतत नामजप करणे, तरच देहत्याग केल्यावरही साधना करणे शक्य होते, अन्यथा ते अशक्य होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !

‘मला नमस्कार करा’, असे साधकांना सांगण्यापेक्षा ‘तुम्ही कोणती साधना करणे योग्य आहे ?’, हे सांगणे महत्त्वाचे आहे; म्हणून मी साधकांना केवळ साधनाच सांगितली, कुणालाही ‘मला नमस्कार करा’, असे सांगितलेले नाही. त्यामुळे सनातनच्या बहुसंख्य साधकांनी मला कधी नमस्कारही केलेला नाही. ते देवालाच नमस्कार करतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

नकारात्मक न बोलण्याचे लाभ

आपल्या वाणीतही एक प्रकारची दैवी शक्ती दडलेली असल्याने ती वाणीच आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्याकडून योग्य कर्म घडवते ! : आपण आत्मविश्वास अल्प करणारे किंवा नकारात्मकता निर्माण करणारे बोल कधीच बोलू नयेत; कारण आपल्या वाणीतही एक प्रकारची दैवी शक्ती दडलेली असते. ही शक्ती आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते; म्हणून नेहमी चांगलेच बोलावे. आपली वाणीच आपल्याला आशीर्वाद … Read more

साधनेने व्यक्तीचा अहं अल्प होऊ लागल्यावर तिच्या जीवनाचे सारथ्य भगवंतच करतो !

व्यक्तीमधील अहंचा जोपर्यंत लय होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या देहाचा सारथी हा ‘मी’रूपी अहंच असतो, म्हणजेच मनुष्याच्या जीवनाला ‘मी’रूपी मायाच एक प्रकारे चालवत असते. ‘मी’रूपी सारथी असलेल्या गाडीला सुख-दुःखाची चाके असतात. साधनेने मनुष्याचा अहं अल्प होऊ लागला की, ‘जीवनाचे सारथ्य मग भगवंतच करतो. भगवंत चालवत असलेली ही देहरूपी गाडी मात्र सच्चिदानंदाकडे (सत् चित् आनंदाकडे) प्रवास … Read more

‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !

अध्यात्मात ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मरावेच लागते, म्हणजे या देहातील ‘मी’पणा नष्ट व्हावा लागतो, तरच ‘मी’ची जागा भगवंत घेतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१४.४.२०२०)

आध्यात्मिक पूर्वतयारीचे महत्त्व !

कोणतीही सेवा अथवा कृती करतांना प्रथम आध्यात्मिक स्तरावर पूर्वसिद्धता केली, तर देवतांना त्या ठिकाणी येण्यास सुलभ होते, उदा. प्रत्येक कृती करतांना प्रार्थना करणे, देवाचे स्मरण करणे, देवाची मानसपूजा करणे इत्यादी. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.३.२०१८)

भावपूर्ण सेवेमुळे चुकांवर मात करण्यास देवाचे साहाय्य मिळते !

भाव असेल, तर सेवेतील चुका आपोआप अल्प होतात; कारण त्या वेळी सेवेत देव स्वतःहून साहाय्य करतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.३.२०१८)

भावपूर्ण नामजप हीच खरी साधना !

आपले दिवसभरातील साधनेचे कष्ट देव पहात असतो. याला ‘साधना’ असे म्हणतात. केवळ यांत्रिकपणे नाम घेणे, म्हणजे साधना नव्हे. ‘यांत्रिकपणे नाम होणे’, ही साधनेची पहिली पायरी आहे. साधना करत असतांना ती पायरी आपल्याला चढावीच लागते; परंतु पुढे मात्र ‘नाम घेतांना ते भावपूर्ण होणे’, यासाठी प्रयत्न करावे लागतात, तरच आपल्या चेहर्‍यावर नामाचा आनंद दिसतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) … Read more

देव केवळ भाव पहातो !

देव तुमच्या कृतीतील केवळ ‘भाव’ पहातो. आपण भाव ठेवतांना ‘देवाने प्रसादरूपाने तो ग्रहण केला’, असा विचार असावा. सेवा केल्यावर ‘प्रत्येक कृती करतांना ईश्वराप्रती भाव होता का ?’, हे मनाला विचारले, तरच आपण ‘आपले मन भगवंताला समर्पित केले’, असे समजावे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.३.२०१८)