व्यष्टी साधना

अ. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. आ. अहंमुळे तामसिकता वाढते. इ. परेच्छेने वागलो, तर अहं न्यून होतो. ई. मनात कृतज्ञताभाव असणे महत्त्वाचे आहे. – पू. (सौ.) संगीता जाधव

मनासारखे न झाल्यास दुःखी न होता साधकांनी ईश्वरेच्छा समजून घ्यायला हवी !

‘एखादी सेवा व्हायला पाहिजे’, असे आपण ठरवतो आणि मनासारखे झाले नाही की, आपल्याला दुःख होते अन् ‘देवाला अपेक्षित असे झाले नाही’, असे वाटते. आपण देवाचे नियोजन पहायला हवे.’ ‘परात्पर गुरुदेव सर्वशक्तीमान आहेत. त्यांना कोणतीच गोष्ट कठीण नाही. ते सर्वकाही देऊ शकतात; पण आपण त्यासाठी पात्रता निर्माण करणे आवश्यक आहे.’ – पू. (सौ.) संगीता जाधव

देव एका चौकटीत नसून सर्वत्र असल्याने त्याला चौकटीत न शोधता प्रत्येक स्थितीत अनुभवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक

‘देव इथेच भेटणार. तिथे नाही भेटणार. हे केले, तर देव भेटणार. हे केले नाही, तर भेटणार नाही’, असे काही नाही. देवाला कोणतीच चौकट नाही. आपण ‘देव हवा’; म्हणून साधना करतो; पण एक चौकट घालून तेथे देवाला शोधतो आणि ‘तो सापडत नाही’, असे म्हणतो. देव कोणत्याही चौकटीत नाही. ज्या परिस्थितीत देवाने ठेवले, त्यात देवाला शोधले की, … Read more

सेवा कशी करावी ?

अ. सेवा करतांना अहंचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू असते. अहंमुळे साधक सेवा करतांना मनाला वाटेल, तसे पालट करत असतो. यासाठी मनाचे न ऐकता उत्तरदायी साधकांना विचारून सेवा करायला हवी. आ. सेवा करतांना सेवेत मन पूर्णपणे एकरूप केले, तरच मनाचे अर्पण होऊन मनाचे प्रारब्ध अल्प होणार आहे. त्यामुळे मानसिक त्रासही न्यून होणार आहेत. इ. साधकांनी सेवा … Read more

सेवा करण्याचे महत्त्व !

साधकांचे तन, मन आणि बुद्धी अर्पण व्हावी, यासाठी सेवा आहे. साधकांतील अहं न्यून होण्यासाठी गुरुसेवा करणे आवश्यक आहे. ‘आपली तळमळ वाढावी, आपले मन आणि बुद्धी शुद्ध व्हावी, तसेच अहंचे निर्मूलन व्हावे’, यासाठी गुरुदेवांनी सर्व सेवा निर्माण केल्या आहेत. – पू. (सौ.) संगीता जाधव