भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी पाश्‍चात्त्यांचे प्रशस्तीपत्र नको !

पारतंत्र्यामुळे आमच्यात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळेच आता पाश्‍चात्त्यांनी प्रशस्तीपत्र दिल्याविना आम्हाला आमचे सिद्धांत शिरोधार्य वाटत नाहीत. सुदैवाने आता पाश्‍चात्त्य लोकच आमचे पातंजल योगशास्त्रासारखे शास्त्र अभ्यासू लागले आहेत. पाश्‍चात्त्य लोक कितीही भौतिकवादी असले, तरी जिज्ञासू आहेत. त्यांच्या स्तुती-निंदेची अपेक्षा न करता आम्ही आपल्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे आणि त्याचे आचरण केले पाहिजे. – सुप्रसिद्ध कायदेपंडित श्री. रजनीकांत … Read more

‘हिंदुत्ववादी संघटनाच सर्व काही करतील’, अशी अपेक्षा न करता प्रत्येक हिंदूने क्रियाशील होणे आवश्यक !

एका डॉक्टरांनी तेथील एका निराश्रित हिंदु महिलेची करुण कहाणी सांगून तिच्यासाठी संघ काय करील ? असा प्रश्न केला. त्यावर डॉ. हेडगेवार उत्तरले, ‘सध्या संघ काहीही करू शकत नाही. मात्र तुम्ही ते काम अंगावर घेत असाल, तर मी व्यक्तीशः साहाय्य देण्यास तयार आहे’. मग काय करायचा तुमचा संघ ? अशा शब्दांत त्या प्रश्न् विचारणाऱ्या गृहस्थाने असमाधान … Read more

अजेय राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक घटक

क्षात्रतेज असलेले सैनिकी सामर्थ्य आणि प्रखर राष्ट्रभक्तीने भारलेला समाज या दोन्हींमुळेच अजेय राष्ट्र निर्माण होते ! – सरसंघचालक प.पू, गोळवलकर गुरुजी

प्रसिद्धीमाध्यमांनो याकडे लक्ष द्या!

एक मास जरी प्रसिद्धीमाध्यमांनी योग्य पद्धतीने विषयांना प्रसिद्धी दिली, तरी एका मासात देशाची स्थिती पालटेल ! – श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंदसरस्वती महाराज, पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ, पुरी पिठाधीश्वर (२१.११.२०१३)

स्वतंत्र आणि स्वातंत्र्य

 भारताला ‘स्वातंत्र्य’ मिळाले, म्हणजे नेमके काय झाले ? बाह्यतः परकियांची राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली, इतकेच स्वातंत्र्य मिळाले, याचा अर्थ जाणवतो. ‘स्वम् आत्मानं शास्ति सः स्वतन्त्रः ।’, म्हणजे ‘जो स्वत़ःचे, स्वतःच्या आशा-आकांक्षा, भाव-भावना, विकार आणि विचार इत्यादींचे नियमन करतो, तो स्वतंत्र’. येथे आत्मा याचा लौकिक अर्थ अपेक्षित आहे, अध्यात्माचा संबंध नाही. त्याचा भाव आणि … Read more

आध्यात्मिक सत्ता नित्य आणि सनातन आहे !

 भारताचेच उदाहरण पाहिल्यास पूर्वी हिंदुस्थान या संकल्पनेत पाकिस्तान, आताचा भारत, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, पूर्व बंगाल, जावा, सुमात्रा, तिबेट, बलुचिस्तान, नेपाळ, भूतान, अक्साई आणि चीन एवढा मोठा भूभाग समाविष्ट होता. त्याचे लचके तोडत प्रचलित भारत राष्ट्र म्हणून उभा आहे. राष्ट्राची मर्यादा काळाच्या ओघात वृद्धी वा क्षय पावू शकते. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना पालटणारी आणि परिवर्तनीय आहे; … Read more

महाराष्ट्र म्हणजे हिंदुस्थानचा खड्गहस्त

हिंदुस्थान सोडून बाकीच्या सर्व लघुराष्ट्रांना आपल्या हिंदु धर्म जीवनाची, शिकवण देण्याचे दायित्व आपल्या महाराष्ट्र्राचे आहे बरं कां ! म्हणून तर आपले राष्ट्र महान आहे. ३०० वर्षांपूर्वीच ही जाणीव समर्थांनी त्यांच्या ‘दासबोध’ नामक ग्रंथात देऊन ठेवली आहे. ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।’ ‘मराठा’ म्हणजे क्षात्रवृत्ती होय. मराठा हा शब्द जातिवाचक नसून भाववाचक आहे. स्वातंत्र्यवीर … Read more

साधनेने संचित आणि इच्छा यांचा नाश होणे

विद्यारण्य स्वामी फारच गरीब होते. अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्रीची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. तेव्हा त्यांनी थकून संन्यास घेतला. त्या वेळी गायत्री मातेचे दर्शन झाले. देवी म्हणाली, ‘मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग.’ स्वामी म्हणाले, ‘आता मला काही मागायची इच्छा नाही. इच्छा होती, तेव्हा तू मला प्रसन्न झाली नाहीस. असे का झाले … Read more

आर्थिक तत्त्वज्ञान नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते !

नेहरूंनी ‘सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ दारिद्य्रात आहे’, असे सांगितल्यावर डॉ. राधाकृष्णन् यांनी ‘आर्थिक परिस्थिती नव्हे, तर चिरंतन तत्त्वज्ञान जगावर राज्य करते’, असे सांगणे : नेहरूंनी सर्व जागतिक आणि भारतीय समस्यांचे मूळ आपल्या दारिद्य्रात आहे. लोकांच्या जीवनमानाची पातळी उंचावल्यास सर्व प्रश्न आपोआप सुटतील, अशी आशा व्यक्त केली.   त्या वेळी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् म्हणाले, … Read more

संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन

त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे ! : संचलनाला साथ देणाऱ्या संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन करतांना सावधान साप्ताहिकाने म्हटले होते, ‘त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे. ती आशेची हाक आहे. तो पराक्रमाला हुंकार आहे. तो विजीगिषेचा … Read more