महत्त्व तर भगवंतालाच आहे !
भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही सेवक । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही दास । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही साधक ।। – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही सेवक । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही दास । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही साधक ।। – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
अ. ‘जेवढा वेळ ईश्वराची अनुभूती येते’, ती अवस्था म्हणजे ‘भाव.’ आ. ‘ईश्वर जे करेल, ते योग्यच आहे’, असे वाटणे, म्हणजे ‘श्रद्धा.’ इ. ‘ईश्वराने जे केले, ते योग्यच आहे’, असा विचार करणे, म्हणजे ‘भक्ती.’ – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
स्वतःकडे तटस्थपणाने पहाणे, ही लवकर संत बनण्याची प्रक्रिया असते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
उत्तम नेतृत्व करण्यापूर्वी उत्तम साधक बनले पाहिजे. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
आपण संघर्षाला ईश्वराकडे घेऊन जायला हवे. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
‘आपल्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती ही भगवंताची इच्छा आहे’, असे समजावे. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
अ. (वाईट) सवयी मोडण्यासाठी ईश्वरासमोर ध्येय ठरवून घेऊन कृती करण्याचा प्रयत्न करणे. आ. स्वतःचे निरीक्षण जागृत असले पाहिजे, तरच स्वतःतील अहंचे पैलू आणि त्रुटी लक्षात येतात. इ. जो स्वतःच्या चुका सांगतो आणि मान्य करतो, तोच ईश्वराला आवडतो अन् ईश्वर त्याचे रक्षण करतो. ई. ‘आम्ही जे करत आहोत, ते स्वतःच्या शुद्धीसाठी आहे’, हे लक्षात घ्यावे. – … Read more
अ. जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते. आ. ‘मन मोकळे करणे’, म्हणजे ईश्वराने सुचवलेले बोलणे आणि सांगणे होय. मन रिकामे (मोकळे) केल्यानंतरच ते शांत होते. मनमोकळेपणा, म्हणजे ‘आपल्याला जे सांगावेसे वाटत नाही’, तेच सांगायचे. इ. मनोबलासमवेत … Read more
आपले मन हेच अनुसंधानाचे माध्यम आहे. मनच आपल्याला मायेमध्ये अडकवून ठेवते आणि मनच ईश्वरप्राप्तीच्या दिशेने घेऊन जाते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
जे साधक ध्येय निश्चित करून स्वतःकडून झालेल्या चुका स्वीकारतात, स्वतःच्या चुका लक्षात आल्यावर इतरांचे साहाय्य घेतात आणि इतरांच्या चुका लक्षात आल्यावर त्यांनाही साहाय्य करतात, त्या साधकांची साधना होत असते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे