अखंड कृतज्ञता…!

‘जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून कृतज्ञता व्यक्त करावी. सतत आणि अखंड कृतज्ञता व्यक्त केल्याने ‘भगवंतच सर्वकाही करत आहे’, हा संस्कार अंतर्मनावर होऊन अहंभाव अल्प होण्यास साहाय्य होते. – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

दुसऱ्या कुणामुळे आपल्याला सुख-दुःख वाटणे, ही कुबुद्धी (चुकीचे) असून ‘मी करतो, मला येते’, असे वाटणे हा वृथा अभिमान असणे

१. ‘आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्या-वाईट घटना आणि प्रसंग यांसाठी आपण इतरांना उत्तरदायी समजत असतो; परंतु ‘जे घडत असते, ते केवळ आपल्या प्राब्धानुसार घडत असते. आपल्याच कर्माचे ते फळ असते’, हे समजून घेतल्यास इतरांविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया अल्प होऊ शकतात. २. मनुष्य पराधीन (ईश्वराधीन) आहे. कर्मयोगातील प्रसिद्ध श्लोक, तरी दुसरे काय सांगतो ? पुढील श्लोकातून हे … Read more

प्रारब्ध संपवण्याचे महत्त्व, पाप-पुण्य आणि कर्मफल !

१. इतरांमुळे प्रारब्धभोग संपण्यास साहाय्य होणे ‘एखादी व्यक्ती, उदा. पती, पत्नी, शेजारी, नातेवाईक अथवा अन्य आपल्याशी अयोग्य प्रकारे वागतात’, असे आपल्याला वाटते. प्रत्यक्षात ते आपल्या प्रारब्धानुसार आपल्या जवळ आलेले असतात आणि ‘बुद्धी प्रारब्ध सारिणी’ या उक्तीनुसार ते तसे वागून आपल्याशी असलेले देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात. अशा प्रकारे ते आपले प्रारब्धभोग भोगून संपवण्यास साहाय्य करत असतात. … Read more

परिस्थिती स्वीकारणे

‘परिस्थिती साधकाला घडवत असते. परिस्थिती स्वीकारली की, तो घडतो, म्हणजेच त्यातून त्याची साधना होते. स्वीकारले नाही, तर तो बिघडतो. म्हणजेच त्याच्या मनामध्ये विकल्प येऊन तो देवापासून दूर जातो. १. निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारल्यास देवाची कृपा निश्‍चितच होते ! निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे देवाने आपल्यासाठी दिलेला प्रसाद आहे. तो प्रसाद या भावाने ग्रहण केल्यास (म्हणजे निर्माण … Read more

परेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने वागणे

‘परेच्छेने किंवा ईश्‍वरेच्छेने वागतांना आरंभी त्याचा त्रास झाला, तरी त्यातून साधना होते आणि पुढे त्यातून आनंदाची प्राप्ती होते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

ईश्वरी नियोजनानुसार योग्य वेळी मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते

‘वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही, तर ईश्‍वरी नियोजनानुसार अगदी वेळेवर (योग्य वेळेतच) मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ मिळते.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होईल

‘भगवंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सेवा उपलब्ध करून देतो. माझ्याकडून सेवा करवूनही घेतो; परंतु सेवा झाल्यावर कर्तेपणाच्या विचारांमुळे ‘ती सेवा मी केली’, असे साधकाला वाटते. कर्तेपणा नष्ट करण्यासाठी प्रत्येक सेवेची संधी दिल्याविषयी, सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’ – … Read more

अपेक्षा करणे

‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. अपेक्षापूर्ती झाल्यावर तात्कालिक सुख मिळते; परंतु त्यामुळे अहंचे पोषण होते आणि अपेक्षेप्रमाणे झाले नाही की, दुःख होते. म्हणजे दोन्ही प्रसंगांत साधनेच्या दृष्टीने हानीच आहे.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

देवाच्या अनुसंधानात राहून केलेली सेवा देवाला आवडेल !

‘पुढीलपैकी कोणत्या साधकाची सेवा देवाला आवडेल ? एक साधक सेवा करतांना ‘चूक तर होणार नाही ना ?’, या विचाराने (भीतीने) सतर्क राहून एक प्रकारे ‘चुकांच्या’ अनुसंधानात राहून सेवा करतो, तर दुसरा साधक ‘देवाच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा देवच करवून घेत आहे, ती करतांना काही चुका झाल्यास, देव मला माझ्या स्वभावदोषांची जाणीव करून देत मला साधनेत … Read more

शिकण्याच्या स्थितीत रहाणे – साधनेला अत्यंत पोषक घटक !

१. शिकण्याची स्थिती ‘सत्संग, बैठक, प्रसार, संपर्क अथवा एखादी सेवा केल्यानंतर ‘मला काय शिकायला मिळाले ?’, असा विचार माझ्या मनात लगेच येतो का ?’, असा विचार मनात येणे, म्हणजेच शिकण्याच्या स्थितीत रहाणे होय. हे साधनेला अत्यंत पोषक आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अनंत काळ शिकत राहिले, तरी शिकणे पूर्ण होऊ शकत नाही. भगवंत साधकांना … Read more