साधना करतांना आपले क्रियमाणही वापरणे आवश्यक !

आजारी साधकाने त्याची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करायलाच हवेत. त्याशिवाय वैद्यकीय उपचारही करायला हवेत, तरच लवकर बरे वाटते. साधना करतांना सर्वकाही देवावर सोडून उपयोगाचे नाही; आपले क्रियमाणही वापरले पाहिजे, तरच योग्य पद्धतीने साधना केल्यासारखे होते. – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.१२.२०१९)

आईच्या गर्भाचे अनन्यसाधारण महत्त्व 

विज्ञानाच्या साहाय्याने बाळाला काचेच्या पेटीत (इन्क्युबेटरमध्ये) जिवंत ठेवता येऊ शकते; परंतु संपूर्ण विश्वात विज्ञानाला आजपर्यंत अशी एकही काचेची पेटी (इन्क्युबेटर) बनवता आली नाही की, ज्यामध्ये आईच्या गर्भातील माया, संस्कार आणि प्रेम त्या बाळाला देता येईल.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

साधनेतील प्राथमिक टप्प्यात स्त्रियांची प्रगती लवकर होते; परंतु ठराविक टप्प्यानंतर त्या मायेत अडकत असल्याने पुरुष संतांची संख्या अधिक असते !

स्त्रियांमध्ये भाव असल्याने साधनेतील प्राथमिक टप्प्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची प्रगती लवकर होते. नंतर पुरुष लवकर संत होतांना दिसून येतात; कारण स्त्रियांपेक्षा पुरुष मायेत अल्प प्रमाणात अडकलेले असतात. स्त्रीला तिचा नवरा, मुले-बाळे, नातवंडे या सर्वांविषयीचे विचार मायेत अडकवतात. त्यामुळे तिचा अध्यात्मात पुढे जाण्याचा वेग काही ठराविक टप्प्यानंतर मंदावतो; म्हणून अध्यात्मात स्त्रिया संत होण्याची संख्या त्यामानाने अल्प असते. … Read more

अध्यात्माच्या मार्गाने जातांना दुस-यांना आनंद दिल्यावर साधनेत प्रगती होते ! 

‘आतापर्यंत जगत आलेले मायेतील आयुष्य संपवून, सर्वसंगपरित्याग करून अध्यात्माच्या मार्गाने जातांना सतत दुसर्‍यांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच साधनेत प्रगती होते. दुसर्‍यांना आनंद देता देता आपल्याला गुरुकृपेने केव्हा ‘सत्-चित्-आनंदाची अनुभूती येऊ लागते’, ते कळतही नाही. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१९.४.२०२०)

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा साधकांच्या चपलांप्रतीचा उच्च भाव !

आपल्या साधकांच्या चपला म्हणजे ‘गुरुपादुका’च आहेत. ‘वस्तू काय आहे ? कुणाची आहे ?’, यापेक्षा त्या वस्तूप्रतीचा भाव महत्त्वाचा आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

खरी ‘देवपूजा’

‘सेवा करतांना एखादी चूक झाल्यावर त्यासाठी लगेच क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, हीच खरी ‘देवपूजा’ आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (२८.४.२०२०)

मनुष्यजन्मात साधना करण्याचे महत्त्व

‘अनेक जन्मांनंतर मनुष्यजन्म लाभतो आणि ‘अनेक जन्म केलेल्या साधनेचे फळ’ म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांसारखे ‘गुरु’ त्या मनुष्यजिवाच्या जीवनात येतात. मनुष्याचे आयुष्य पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना याची सतत जाणीव करून देतात आणि मनुष्याच्या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी ते साधकांना साधना शिकवतात. जोपर्यंत आपण … Read more

‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ म्हणजे काय ?

अध्यात्मात जे शिकलो, ते लगेच कृतीत आणणे, हेच ‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ आहे ! ईश्वराप्रती असलेल्या भावानेच अध्यात्मशास्त्र जाणता येते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे

अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे. अध्यात्मात शिकू तेवढे अल्प आहे. शिकण्यासाठी अनेक जन्मही अपुरे पडतील. त्यामुळे अध्यात्माचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा त्यामधील तत्त्व ओळखून त्यामागील शास्त्र जाणून घ्यायला हवे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

अध्यात्म सुंदर आहे

अध्यात्म सुंदर आहे. ते जगणे आणि अनुभवणे, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेणे ! -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ