पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !

‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ असण्यामागील शास्त्र !

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर धर्मांत असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक !

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

‘अश्‍लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. ‘रामराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदर्श होते; कारण ती राज्ये चारित्र्यसंपन्न होती. सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्य संपन्नच असेल.’ – … Read more

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, हे लक्षात घ्या !

‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताचे प्रारब्ध पालटण्यासाठी आध्यात्मिक स्तराचे उपायच आवश्यक !

‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी हे करा !

‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्‍या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी इतिहासातून स्फूर्ती घ्या !

‘रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नुसते वाचण्यापेक्षा त्यांतील घटनांकडून स्फूर्ती घेऊन सनातन धर्माचे रक्षण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले