अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

‘रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात ते धन्य आहेत. अहंकारी माणूस रडत नाही. अहंकार अश्रू ढाळू देत नाही. अहंकार्‍याच्या वार्‍यालाही भाव उभा रहात नाही. भक्तीचा त्याला कधीच गंध येत नाही.’

काही आल्हाददायक गोष्टी परिणामी मृत्यूला कारण ठरतात !

‘काही गोष्टी आल्हाददायक असतात; परंतु परिणामी घातक ठरतात. व्याध हरिणाला पकडण्याकरताच मधुर वाद्य वाजवतो. हरिणाला ते गाणे गोड वाटते; पण ते मृत्यूला कारण होते.’

राजदंडाचा अंकुश नसल्याने समाजाची स्थिती अराजकाची झाली आहे !

‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य आहे. जर राजदंडाने ते कार्य पार पाडले नाही, तर समाजात मात्स्य न्याय (मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो.) माजेल.’

वासनाधीन असणा-यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असून ते त्यांच्या स्वार्थी वासनापूर्तीचे साधन असणे

‘वासनेचा ज्याला स्पर्श होत नाही, विकाराची सामग्री विनायास उपलब्ध असतांनाही, तो अविचल असतो, विकार ज्याच्या आसपासही भटकू शकत नाहीत, तोच (असे केवळ योगी वा संतच असू शकतात.) समाजाचे कल्याण करू शकतो. व्यक्ती आणि समाज यांना असेल तिथून वरच्या पायरीवर हमखास नेतोच नेतो. वासनाधीन असणार्‍यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असते. स्वतःच्या स्वार्थी वासनापूर्तीचे … Read more

परंपरांच्या विरोधात जाऊन समाजसुधारणा करणारे पुरोगामी आणि साम्यवादी पापाच्या पायावर उभे असणे

‘हे साम्यवादी आम्हा परपंरावाद्यांचा ‘जड, यांत्रिक आणि निर्जीव’ असा उपहास करतात. आम्हाला ‘कालप्रवाहाची उपेक्षा करणारे आहोत’, अशा शिव्याही हासडतात. खरे तर हे पुरोगामी, हे साम्यवादीच त्या अर्थाने परंपरावादी आहेत. स्वत:ला गोरगरिबांचे कैवारी म्हणवणारे वरकरणी कितीही समाजकल्याण आणि लोकहित यांच्या गोष्टी करू देत, योजना बनवू देत, ते सर्व पापाच्या पायावरच उभे आहेत.’

राष्ट्र आणि विश्‍व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व्हा !

साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य अन् ऋण आहे. प्रत्येकानेच ते बजावले पाहिजे. उपेक्षिले तर सर्वनाश अटळ आहे. धर्माकरिता समर्पित झाले पाहिजे. सर्वस्व वाहिले पाहिजे. त्यातच त्याचा, तसेच राष्ट्र आणि विश्‍व यांचाही उत्कर्ष आहे. कल्याण आहे आणि मुक्तीही ! धर्माकरिता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग … Read more

मोहक विषवेली एक दिवस सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय, असे भय निर्माण झाले असणे

सनातन हिंदु धर्म संस्कृतीच्या अत्यंत जुनाट सनातन वृक्षाला ही विषवेली बिलगली असून; ती इतकी वाढली आहे की, तो वृक्षच आता दिसेनासा झाला आहे. ती मोहक विषवेली आता एक दिवस तो सनातन वृक्षच उन्मळून टाकेल की काय ?, असे भय निर्माण झाले आहे. हिंदु जीवन ही चीज हिंदूनाच दुर्मिळ झाली आहे. हिंदुत्वाची बात दूरची ! आणि … Read more

मक्सम्यूलरने हिंदु धर्माचे मूळ असलेल्या वेदांनाच उखडून टाकणे

ऋग्वेदाच्या अनुवादाविषयी मॅक्सम्यूलर हा पाश्‍चिमात्त्य विचारवंत आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, वेद हेच हिंदूंच्या धर्माचे मूळ आहे. … आणि तेच कसे हीन आहेत ?, हे मी दाखवतो आहे. माझी खात्री आहे की, तीन सहस्त्र वर्षांपासून जे जे या वेदापासून मोहरले आहे, त्या सर्वांचे मूळच मी उखडून टाकले आहे.

हिंदुस्थानातच राहिलेला हिंदु अंतःकरणाने मात्र गोरा साहेब झालेला असणे

आज भारतियांच्या घराघरातील तेजस्वी शिक्षणाचे, संस्काराचे निर्मळ निर्झर आटून कोरडे ठणठणीत झाले आहेत. हिंदुस्थानात, हिंदु घराण्यात, हिंदु म्हणून जन्मला, हिंदु म्हणून वाढला, हिंदुस्थानातच राहिला असला, तरी आज अंतःकरणाने तो हिंदु, गोरा साहेब झाला आहे.

इंग्रजी शिक्षण आणि आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींचा प्रभाव यांमुळेच भारतात हुंडाबळीच्या घटनांत वाढ होणे

सती आणि हुंडाबळी यांचा संबंध काय ? सतीची घटना १०० वर्षांत एखादीच घडते आणि हुंडाबळी हे प्रकरण इंग्रजी राज्य आणि इंग्रजी शिक्षण आल्यानंतर चालू झाले. इंग्रजी शिक्षणाने निर्माण केलेल्या आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींच्या चैनी, ऐषारामी जीवनाची ओढ, व्यक्तीस्वातंत्र्य, सनातन हिंदु धर्म परंपरा-रुढी-रिवाज यांकडे तुच्छतेने पहाण्याची वृत्ती, मुलींचे वाढते वय (म्हणजे २८ ते ३२ वर्षे किंवा त्यापेक्षा … Read more