व्यष्टी आणि समष्टी संत यांचे कार्य आणि काळानुसार साधना करण्यास शिकवणार्‍या संतांची समाजाला आवश्यकता !

बहुतेक संत हे व्यष्टी संत असतात. ते केवळ इतरांना नामजपाच्या मार्गावर आणतात; परंतु समष्टी संत लोकांना नामजप शिकवण्याच्या समवेत लोकांमध्ये क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज निर्माण करतात. असे संत लोकांना समाजात फोफावलेल्या अधर्माविरुद्ध आवाज उठवायला शिकवतात. ‘समाजातील व्यक्तींना साधनेची योग्य दिशा दाखवणे आणि त्यांची अल्प कालावधीत शीघ्र गतीने प्रगती करून घेणे’, अशा समष्टी संतांचीच समाजाला सध्या आवश्यकता आहे. कलियुगात सर्वत्र अधर्माचे राज्य असल्याने त्याविरुद्ध आवाज उठवायला शिकवणार्‍या संतांची सध्या समाजाला आवश्यकता आहे. काळानुसार साधना करण्यास शिकवणारे संत आता हवेत. समष्टी सेवा करणारा जीव ईश्वराला आवडतो.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment