साधकांनो, जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते आणि आपण मनाला सतत देवाला धरून रहायला शिकवले, तर त्यातून आपली साधना होते !

‘माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही’, असा विचार करायला नको. आपण जे काही करतो, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद देवाकडे होत असते. आपल्याला असे वाटणे; म्हणजे आपल्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. आपल्या संदर्भात जे काही घडते, ते चांगल्यासाठीच घडते. देव कधीच चुकीचे करणार नाही. ‘देव आणि मी’, याकडेच आपण लक्ष द्यायचे. ‘कोण कसे वागते ?’, याकडे लक्ष … Read more

साधकाने ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय न ठेवता ईश्वरप्राप्तीचे ध्येय ठेवून साधना करणे महत्वाचे !

‘देवाच्या नियोजनाप्रमाणे ईश्‍वरी राज्य जेव्हा यायचे, तेव्हाच येणार आहे. ती अपेक्षाही नको. साधकाने ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय ठेवून साधना करायला नको. ‘मला ईश्‍वर हवा आहे’, या ध्येयासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. काळानुसार ईश्‍वरी राज्याची स्थापना होणारच आहे. त्यासाठी आपण वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. साधना करतांना साधकाची सात्त्विकता वाढल्यावर त्याचे फळ म्हणून आपोआपच ईश्‍वरी राज्याची स्थापना … Read more

अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

‘रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात ते धन्य आहेत. अहंकारी माणूस रडत नाही. अहंकार अश्रू ढाळू देत नाही. अहंकार्‍याच्या वार्‍यालाही भाव उभा रहात नाही. भक्तीचा त्याला कधीच गंध येत नाही.’

सेवेत चुका झाल्यावर लक्षात ठेवायचे काही दृष्टीकोन !

अ. परात्पर गुरु डॉक्टर काही वेळा त्यांनी स्वतः केलेले लिखाण मला पडताळण्यासाठी देतात. मी त्यामध्ये काही लहानसहान सुचवले असले, तरी ते साधकांना सांगतात, ‘‘बरे झाले. आता लिखाण अजून परिपूर्ण झाले.’’ ‘सनातनचे कोणतेही कार्य परिपूर्ण व्हायला हवे’, ही त्यांच्यासारखी तळमळ आपणही ठेवली, तर दुसर्‍यांनी आपल्या सेवेत चुका दाखवल्यास आपल्याला वाईट वाटणार नाही. आ. ‘चुकांतून देव आपल्याला … Read more

अन्नपाणी ग्रहण करण्याप्रमाणेच भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म !

‘आपण जसे प्रतिदिन अन्नपाणी ग्रहण करतो, तसे प्रतिदिन भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपले नित्य कर्म आहे. ते केल्यानेच आपण आपत्कालात जिवंत राहू शकतो.’

ईश्वरचरणी कृतज्ञता का व्यक्त करायची ?

‘ईश्‍वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणार्‍या ईश्‍वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींचा त्रास असणाऱ्या साधकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन !

‘वर्ष २००० ते २००३ या काळात फोंडा येथील सुखसागर सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः साधकांसाठी सत्संग घेत असत. त्या वेळी नुकतेच वाईट शक्तींचे त्रास चालू झाले होते. साधकांना पुष्कळच त्रास होत होते. त्या कालावधीपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला ‘वाईट शक्तींचे जग कसे असते ?’ याविषयी माहिती द्यायला प्रारंभ केला. त्या वेळी त्यांनी … Read more

व्यक्तीचे खरे सौंदर्य !

निरागसता हे मनाचे, विवेकता हे बुद्धीचे आणि लीनता हे शुद्ध अहंचे (देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या न्यूनातिन्यून अहंचे) सौंदर्य आहे.

‘संस्कृती टिकवा !’

सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट असून तरुण मुले-मुली हिंदु संस्कृतीचा र्‍हास करत असल्याचे दिसणे ‘सध्या समाजाची स्थिती अत्यंत बिकट आहे. तरुण मुले-मुली आपल्या हिंदु संस्कृतीचा र्‍हास करतांना दिसत आहेत. मुला-मुलींचे कपडे, त्यांची केशरचना आणि मुलींच्या कपाळावर कुंकू नसणे हे सर्व पाहिल्यावर अयोग्य वाटते, एकूणच तरुणांचे राहणीमान, वागणे-बोलणे इत्यादी सर्वच गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे. साम्यवाद आणि … Read more

काळानुसार समष्टी साधनेचे महत्त्व !

‘काळाला अनुकूल अशी आपली साधना हवी. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना केवळ व्रते करण्यापेक्षा घरोघर जाऊन निद्रिस्त समाजाला साधना सांगून त्याला जागृत केले पाहिजे, म्हणजेच समष्टी साधना केली पाहिजे. समाजाला योग्य-अयोग्य गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. सर्व समाजाचे उत्थापन म्हणजेच हिंदु राष्ट्राची निर्मिती !’