आपल्या अस्तित्वाचा विसर आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे साधना !

‘इतरांशी बोलतांना त्यांचे होऊनच बोलायला हवे. यामुळे आपल्याला आपले अस्तित्व विसरून सेवा करण्याची सवय लागते. एकदा का अस्तित्व विसरण्याचा सराव झाला की, देवाच्या अधिक जवळ जाता येते आणि मग देहात त्याचे अस्तित्व जाणवू लागते. आपल्या अस्तित्वाचा विसर आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे साधना.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२४.४.२०२०)

नामसाधनेच्या समवेतच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेला पुष्कळ महत्त्व आहे !

‘नामसाधना असली, तरी नामाच्या समवेत आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी दिवसभरात प्रयत्न नाही केले, तर आपल्या हातून झालेल्या चुकांच्या निवारणामध्ये नामजपामुळे मिळालेली साधनेची ऊर्जा वाया जाते. असे होऊ नये; म्हणून नामसाधनेच्या समवेतच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेला पुष्कळ महत्त्व आहे. बर्‍याचदा नुसत्या नामसाधनेने प्रगती होत नाही. समाजात आपण बघतो की, अनेक नामधारक … Read more

स्वेच्छेचे २ प्रकार !

‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हिंदुत्व जोपासणे म्हणजे काय ?

‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्‍या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

माया आणि अध्यात्म यांतील फरक !

केवळ कृती करणे, म्हणजे माया आणि प्रत्येक कृतीला सात्त्विकतेची जोड देणे, म्हणजे अध्यात्म ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आनंद आहे !

‘आनंद हा फलप्राप्तीमध्ये नाही, तर तो निरपेक्षतेने प्रयत्न करण्यात आहे. असे प्रयत्न करत राहिलो, तर ‘फळ कधी मिळाले ?’, हे लक्षातही येणार नाही.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.९.२०२३)

‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !

‘काहींचा देवावर विश्वास नसतो, त्यामुळे ते प्रार्थना करतच नाहीत. कालांतराने थोडा फार विश्वास निर्माण झाला की, स्वेच्छेसाठी (स्वार्थासाठी) प्रार्थना करतात. प्रार्थनेच्या माध्यमातून देवाची अनुभूती आल्यावर त्यांचा देवाप्रती थोडाफार भाव निर्माण होतो. ते या टप्प्याला केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करतात. त्यापुढे गेल्यावर म्हणजेच संत झाल्यावर ‘सर्वकाही ईश्वरइच्छेने होते’, हे लक्षात घेऊन मग पुन्हा प्रार्थना करत नाहीत. … Read more

नामजपाचे महत्त्व !

‘देवपूजा करणे, संतांची पाद्यपूजा किंवा त्यांच्या पादुकांचे पूजन करणे यांसारख्या उपासनेच्या कृती करतांनाही मनाची एकाग्रता असेल, तरच त्यांचा पूर्ण लाभ होतो. मनाची एकाग्रता नामजपाने साध्य होते. यासाठी पूजेसारख्या कृती नामजप करत कराव्यात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक गोष्टीचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले