कर्मातून ब्रह्म पहाता येणे

आपले प्रत्येक कर्म पूजेप्रमाणे हवे, तरच आपल्याला सर्वत्र ब्रह्म पहाता येईल. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

भगवंतमय दृष्टि असावी

आपल्या दृष्टीतच भगवंत असला पाहिजे, म्हणजे आपण जिथे पाहू, तिथे आपल्याला मंदिर दिसेल. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार साधना कऱण्याचे महत्त्व

कोणत्याही एका मार्गाने साधना केली, तरी प्रगती निश्चित आहे. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार साधना मार्ग निवडावा. स्वतःच्या मनाने साधनामार्ग निवडू नये, नाहीतर अध्यात्मातील अनेक वर्षे वाया जाऊ शकतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

एकावेळी एकच साधना करावी

भोजन करतांना पूर्ण ताट भरून अन्नपदार्थ आपल्यासमोर ठेवले, तर ते सर्वच आपण खाऊ शकत नाही. आपल्याला जेवढे पचेल, तेवढेच आपण खाऊ शकतो. व्यावहारिक शिक्षण घेत असतांनाही एकाच वेळी सर्वच परीक्षेत उत्तीर्ण होऊन अनेक पदव्या प्राप्त करू शकत नाही, तसेच हे आहे. अध्यात्मातही एका वेळी एकच करू शकतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

जन्मांतरीचा साधनामार्ग

‘प्रत्येक जीव त्याच्या पूर्वजन्मात काय शिकला ? त्या जिवाने कोणती साधना केली ?’, यांवरही त्या जिवाची साधनेची सद्यस्थिती अवलंबून असते. पूर्वजन्मात ध्यानयोगाने साधना केली, तर पुढील जन्मातही तोच साधनामार्ग असू शकतो. ‘परमेश्वर प्राप्तीसाठी काहीतरी करणे’, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. अध्यात्मात मार्ग जरी भिन्न असले, तरी ध्येय एकच आहे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

साधना म्हणून पैसे कमवतांना आणि ते खर्च करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक करू नका !

‘पैसे कमवणे आणि ते वापरणे, हे करतांनाही साधना होणे आवश्यक असते. कर्तव्य म्हणून सत्मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. मिळवलेले पैसे वापरतांनाही सुखाची आसक्ती न बाळगता मिळालेल्या सुखात समाधानी रहाणे योग्य ठरते. आर्थिक व्यवहार करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक अल्प करणे, हीच खरी साधना होय … Read more

जो परमेश्वराला प्राप्त करू इच्छितो, जो त्याच्यासाठी रडतो, त्याला तो लाभतो !

‘मूल झाले नाही; म्हणून लोक अश्रूंचे लोट वहातात. धन मिळाले नाही; म्हणून केवढा शोक करत असतात; परंतु परमेश्वर लाभला नाही, म्हणून किती लोक दुःख करतात अन् रडतात ? खरोखरच जो परमेश्वराला प्राप्त करू इच्छितो, जो त्याच्यासाठी रडतो, त्यालाच तो लाभतो.’ – स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)

खऱ्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘सनातन करत असलेले शेकडो यज्ञ आणि ग्रंथप्रकाशने यांचा मूळ उद्देश ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा असला, तरी त्यातून प्रथम एक ‘आदर्श राष्ट्र’ निर्माण होईल आणि त्यानंतर कालांतराने खऱ्या अर्थाने ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, ‘खारीचा वाटा उचलणे’, ही म्हण केवळ बोलण्यापुरती नको, तर रामराज्यासाठी त्यानुसार कृती करण्याची ही वेळ आहे !

‘रामसेतु बांधणे चालू असतांना खारही त्यामध्ये सहभागी झाली होती. ती वाळूत लोळून तिच्या अंगाला चिकटलेली वाळू सेतूवर अंग झटकून पसरवत होती. रामकार्यामध्ये इतक्या लहान जिवानेही अशा प्रकारे सहभाग घेतला होता आणि श्रीरामाने तिचाही उद्धार केला होता. आता पुन्हा आपल्याला रामराज्य आणायचे आहे. त्या खारीचा आदर्श घेऊन आपणही या कार्यात आपल्या परीने सहभागी होणे आवश्यक आहे.’ … Read more

अचल संतमन

संतांचे मन नेहमी ईश्वरी अनुसंधानात स्थिर असते. ते एखाद्या जलाशयातील संथ पाण्यासारखे अचल असते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ