देवाचा शोध घेणे आवश्यक !

‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, हे लक्षात घ्या !

‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताचे प्रारब्ध पालटण्यासाठी आध्यात्मिक स्तराचे उपायच आवश्यक !

‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी हे करा !

‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्‍या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी इतिहासातून स्फूर्ती घ्या !

‘रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नुसते वाचण्यापेक्षा त्यांतील घटनांकडून स्फूर्ती घेऊन सनातन धर्माचे रक्षण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खरा त्याग !

‘साधनेसाठी पैसा, वेळ आदींच्या त्यागापेक्षा ‘मी’पणाचा त्याग, हा खरा त्याग आहे. ‘मी’पणाचा त्याग म्हणजे, ‘मी’, ‘माझे’, ‘स्वकेंद्रित वृत्ती’ आदींचा त्याग. यासाठी गुरु किंवा देव यांना प्रार्थना करावी, ‘दिवसभरातील प्रत्येक प्रसंगात मला माझ्या ‘मी’पणाची जाणीव होऊन तो दूर करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होवोत.’ यानुसार केलेल्या प्रयत्नांचा आढावा प्रतिदिन देवाला द्यावा.’ – (पू.) संदीप आळशी (१४.१२.२०२२)

संतांचे श्रेष्ठत्व !

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परिपूर्ण हिंदु धर्म !

‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अद्वितीय हिंदु धर्म !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांना नीती आणि धर्म शिकवा !

‘पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले