श्वास आणि नाम : नाम श्वासाला जोडणे
भावार्थ : आपण श्वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्वासाला जोडायचे असते. श्वास नामाला जोडायचा नसतो. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज
भावार्थ : आपण श्वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्वासाला जोडायचे असते. श्वास नामाला जोडायचा नसतो. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज
भावार्थ : ‘फकीरकी लकीर’ म्हणजे फकीराची ललकारी, म्हणजे शिष्य. हाच पुढे ‘लकीरका फकीर’ म्हणजे ‘शिष्याचा गुरु’ होतो. लकीर (ललकारी) आणि फकीर यांच्यात जसे अद्वैत असते, तसेच पुढे गुरु-शिष्यात अद्वैत होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज
भावार्थ : सद्गुरूंना शिष्याने एकदा सर्वस्व अर्पण केले की, शिष्याचे स्वतःचे असे काही उरत नाही; म्हणून अशा शिष्याच्या शरिराने किंवा मनाने काही चुका झाल्या, तर त्या एकप्रकारे गुरूंच्याच ठरतात ! गुरुच अपराधी ठरतात ! – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज
भावार्थ : ‘गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते’ म्हणजे शिष्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय रहात नाहीत. एकदा एखाद्याला शिष्य केले की, त्याला पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी गुरु पार पाडतात. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज
भावार्थ : अभिमान असावा तो सात्त्विक असावा, गुरुनामाचा असावा. ऐहिक गोष्टींचा, जग मला मानते, याचा नसावा. – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज
‘एखाद्या गोष्टीची जिज्ञासा असली, तरच ती जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्यातूनच तळमळ निर्माण होते. आत्मज्ञानासंदर्भात तळमळ असली, तरच साधकाकडून साधनेसाठी तीव्र प्रयत्न होतात आणि शेवटी त्याला आत्मज्ञान होते.’ – डॉ. आठवले (मार्गशीर्ष शुद्ध पक्ष ६, कलियुग वर्ष ५११४ (१८.१२.२०१२)
राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्यासाठी जीवन वाहून घेण्याची समष्टी साधना करणारे महान कर्मयोगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ! ‘मी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘आंतरमहाविद्यालयीन मराठी वाङ्मय मंडळा’ची स्थापना केली. तेव्हा शिवसेनेची ‘विद्यार्थी सेना’ नुकतीच कार्यरत होत होती. तेव्हा कुमार कदम इत्यादी ‘विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांबरोबर माझी जवळीक झाली. तेव्हापासून शिवसेनेबद्दल माझ्या मनात जवळीक निर्माण झाली. ती किती … Read more
‘एखाद्याचे अक्षर सुंदर आहे, हे डोळ्यांना दिसते, ते मनाला आवडते. आवडण्याचे कारण ‘अक्षर सुंदर आहे’, हे बुद्धीला कळते. याउलट पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे गेलेल्यांना सूक्ष्मातील स्पंदने कळतात. त्यामुळे त्यांना संतांचे अक्षर चांगले नसले, त्यांनी वेड्यावाकड्या रेखाट्या ओढल्या, तरी त्यांत चैतन्य असल्याचे जाणवते; म्हणून ‘ते चांगले आहे’, असे ते म्हणतात.’ – डॉ. आठवले (२४.६.२००७)
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! भौतिकतेकडे झुकलेल्या समाजाला साधनेकडे वळवणे आणि खर्या शिष्यांना मोक्षाला नेणे, हे गुरूंचे खरे कार्य आहे. खरे शिष्य याच मार्गाचे अनुसरण करून आयुष्यभर समष्टी कार्य करतात. शिष्याने गुरु करत असलेल्या समष्टी कार्यासाठी तन-मन-धनाने समर्पित होणे, ही गुरूंप्रतीची खरी कृतज्ञता होय ! गुरु-शिष्य परंपरेने दिलेले समष्टी योगदान मोठे आहे. … Read more