सेवा परिपूर्ण होण्यासाठी देवाला प्रार्थना करावी !

भावावस्थेत कधी कधी आपण पुष्कळ काही एकाच वेळी करायला जातो. हा एक प्रकारचा उतावीळपणाच आहे. अशा वेळी देवाला प्रार्थना करावी, ‘देवा, या क्षणाला माझ्या आणि सेवेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे, तेच तू माझ्याकडून प्राधान्याने परिपूर्ण करून घे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !

‘आत्म्याचा रंग निळा आहे. अग्निचाही मूळ रंग निळा आहे. आत्मा ही एक ऊर्जा आहे. श्रीविष्णूचाही रंग निळा आहे. ब्रह्मांडाची स्थिती समतोल राखण्याचे कार्य महाविष्णु करतो. आत्मा जर अविनाशी आहे, तर त्यातील विष्णूतत्त्वाशी एकरूप होतांना आपल्यालाही आपल्या आत्मप्रकाशाशी अनुसंधान जोडावे लागेल. यासाठी आपल्याच अंतर्मनाशी आपल्याला एकरूप व्हावे लागेल. यासाठी आपल्याला तीव्र साधना करून स्वभावदोष आणि अहं … Read more

आधुनिक संगीताची शोकांतिका

आताचे आधुनिक संगीत म्हणजे माणूस हरवलेले संगीत आहे. ज्यात माणसासारखा जिवंतपणाच नाही, तेथे देव कुठून येणार ? श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

मन सतत सकारात्मक आणि आनंदी ठेवण्याचे महत्त्व

आपण आपल्या अडचणी एखाद्या व्यक्तीला जेव्हा मनमोकळेपणाने सांगतो, तेव्हा माणुसकीच्या नात्यानेही त्या व्यक्तीशी आपली जवळीक वाढते. त्या व्यक्तीकडून आपल्याला शिकायला मिळते. आपण शिकल्यावर आपल्या आनंदात वाढ होते. आपले मन सतत सकारात्मक आणि आनंदी राहिले, तर जीवनात साधूसंतांची कृपा प्राप्त करणे आणि ईश्वर मिळवणे सोपे जाते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

परमेश्वराला जिंकणे

अध्यात्मात ‘जिव्हाळा’ पुष्कळ महत्त्वाचा आहे. प्रत्येक जिवाला लळा लावणे, म्हणजे जिव्हाळा. जिव्हाळ्यातून प्रत्यक्ष परमेश्वरालाही जिंकता येते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

योग्यांची ‘ब्रह्मदृष्टी’

केवळ शाश्वताला पहाण्याच्या दृष्टीला ‘ब्रह्मदृष्टी’ म्हणतात. ती एकत्वात स्थिर झालेली असते. अशी दृष्टी योग्यांची असते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

भावामुळे कर्मसिद्धांत लागू होत नाही

साधकामध्ये ‘भाव’ असला की, प्रत्येक जिवासाठी कार्यरत असणारा कर्मसिद्धांत त्याला लागू होत नाही; कारण भावामुळे कर्म ‘अकर्म’ होते; म्हणून ‘भाव’ महत्त्वाचा ! भाव हा कर्माला पुसण्याचा ‘खोडरबर’ आहे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

संतांचा मायेकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

तुम्ही ‘जीवन’ म्हणून आयुष्याकडे पहाता, तर संत ‘जीव-न’ म्हणजे ‘जीव नसलेली, माया नसलेली गोष्ट’ म्हणून आयुष्याकडे पहातात; म्हणून ते आनंदी असतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांत सातत्य असणे महत्त्वाचे आहे !

प्रत्येक साधकाने वर्षाच्या शेवटी गुरुपौर्णिमेला मनाची घालमेल करून घेण्यापेक्षा, रोज रात्री स्वतःच्या साधनेचा आढावा घेतला पाहिजे. आपल्या साधनेतील उणिवा रोजच्या रोज दूर करून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे हाच खरा गुरुमंत्र आहे. असे रोजचे आत्मपरीक्षण केले, तरच ईश्वराच्या प्रगतीपुस्तकात आपली चांगल्या गुणांनी नोंद होईल. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

मोक्षमार्गातील शिकवणारे विविध टप्पे

साधक, शिष्य, संत, गुरु आणि सद्गुरु हे सर्व जण मोक्षप्राप्तीच्या ध्येयातील आपल्याला शिकवणारे टप्पे आहेत. आपल्या साधनाप्रवासात ते विविध टप्प्यांना आपल्या संपर्कात येतात; पण आपले मुख्य ध्येय मात्र ईश्‍वरप्राप्तीच आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ