खरा परमार्थी

खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्‍याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्याला इतर सर्वजण परमेश्‍वररूप भासतात. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

जीवनातील विविध समस्यांवर उपवास, तीर्थयात्रा नव्हे, तर ‘साधना’ हाच खरा उपाय !

‘द्वापर आणि त्रेता युगांत सर्वसामान्य व्यक्तीही सात्त्विक होती. त्या काळात आयुष्यमानही अधिक होते. त्यामुळे जीवनातील शारीरिक, मानसिक, आर्थिक यांसारख्या समस्यांसाठी उपवास, तीर्थयात्रा यांसारख्या कर्मकांडाच्या स्तरावरील उपायांसाठी वेळ देणे त्यांना शक्य होते. त्यातून त्यांच्या अडचणी सुटतही होत्या. अडचणी सुटल्या की, उरलेला वेळ साधनेला देणे शक्य होते. सध्या कलियुगात मनुष्य रज-तम प्रधान आहे आणि त्याचे आयुमानही अल्प … Read more

‘स्वार्थी’पणाच्या संदर्भात व्यष्टी साधनेतील धोका आणि समष्टी साधनेचा लाभ !

‘व्यष्टी साधना करणार्‍या साधकाची साधना ‘माझी साधना कशी होईल ? माझी साधना होण्यासाठी मी अजून काय करू ?’, या प्रमुख विचारांच्या आधारे चालू असते. यामध्ये केवळ स्वतःच्याच साधनेचा विचार प्राधान्याने केला जातो. या विचारानुसार साधना करणार्‍या काही साधकांच्या विचारांचे रूपांतर पुढे स्वतःच्याच विचारांत गुरफटून ‘स्वार्थीपणा’मध्ये होण्याची शक्यता अधिक असते. याउलट समष्टी साधना करणार्‍या साधकाची साधना … Read more

संकटसमयी रक्षण होण्यासाठी साधना करणे आवश्यक !

‘कोणत्याही संकटाच्या वेळी, उदा. येणार्‍या आपत्काळात साधना न करणार्‍या केवळ ‘जन्महिंदूंना, अगदी कुटुंबीय किंवा नातेवाईक यांनाही देव वाचवील’, अशी आशा करू नका. ‘नमे भक्तः प्रणश्यति ।’ या वचनाप्रमाणे राष्ट्र-धर्म यांसाठी काही करणारे किंवा साधना करणारे यांनाच देव वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

वेदनेचे लाभ !

‘वेदना झाल्या की, प्रत्येकालाच त्रास होतो आणि ‘त्या कधी थांबतील’, असे वाटते. प्रत्यक्षात वेदनेमुळे फार लाभही होतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. १. एखाद्याच्या पायाचा अस्थिभंग झाला असेल आणि ते विसरून तो चालायला लागला, तर त्याला पुष्कळ वेदना होतात. प्रत्यक्षात वेदना त्याला अस्थिभंगाची जाणीव करून देतात. त्यामुळे तो चालायचा थांबतो. २. एखाद्याला जठरव्रण (अल्सर) … Read more

साधनेत फळाची अपेक्षा न ठेवण्याचे कारण !

‘गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना शिष्याचा सर्व भार गुरूंनी उचललेला असतो. गुरु त्याला त्याच्या मागच्या जन्मीची साधना, त्याचे प्रारब्ध, देवाणघेवाण हिशोब, साधना करण्याची क्षमता, वाईट शक्तींचा त्रास यांसारख्या विविध घटकांचा विचार करून साधना शिकवतात. हे सर्व घटक त्या साधकासाठी त्याच्या वैयक्तिक कर्जाप्रमाणे असतात. तो करत असलेली साधना, त्याचे हे ‘कर्ज’ फेडण्यासाठी वापरली जाते. यात महत्त्वाचे … Read more

चित्तशुद्धीसाठी एक वेगळा विचार !

इंद्रिये, पञ्चतन्मात्रा इत्यादींमध्ये व्यक्त होणार्‍या चैतन्याच्या अंशालासुद्धा ‘देवता’ म्हणण्याची पद्धत आहे. उदा. वाणीची देवता अग्नी, कानांमध्ये दिक् देवता, डोळ्यांची सूर्य, त्वचेची वायू, पायांची उपेन्द्र, हातांची इन्द्र इत्यादी. आता, अपरिहार्य नसताना आपण कोणाशी कठोरपणे बोललो, दुसर्‍याला टोचून बोललो, वाणीने कर्कश स्वर काढले तर आपल्या मुखातील वाणीची देवता अप्रसन्न होते, कारण हा वाणीचा दुरुपयोग आहे. त्याचबरोबर ज्याच्या … Read more

सर्व पंथ देवाचेच आहेत

‘मी ‘या’ पंथाचा आहे, तो ‘त्या’ पंथाचा आहे, असे म्हणून थांबू नका, तर ‘सर्व पंथ देवाचेच आहेत’, हे लक्षात घेऊन व्यापक व्हा, म्हणजे देवाच्या जवळ जाल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ज्योतिषशास्त्राचे महत्त्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले