मायेतील शिक्षण आणि साधना यांच्यातील भेद
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘साधनेमध्ये मनाच्या स्तरावर होणारी अयोग्य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधकाला स्वतःच्या चुका कळत नाहीत आणि त्या मनाच्या स्तरावरील चुका असल्यामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्य कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. त्यामुळे या अयोग्य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्यास त्याला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होण्यास साहाय्य होते, उदा. एका साधकाच्या मनातील … Read more
पूर्वीच्या काळी हिंदू धर्माचरणी आणि धर्माभिमानी होते. त्यामुळे त्यांना ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५) म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.’, हे लागू होत होते. सध्याच्या काळात हिंदू धर्माचरण करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये धर्माभिमानही नाही. त्यामुळे ‘येणार्या आपत्काळात तुमचे रक्षण होण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी साधना करा’, असे त्यांना … Read more
‘गोपींचे कृष्णावरील प्रेम त्याच्या देहावर (शारीरिक स्तरावरचे) नसून त्याच्या मनावर (आध्यात्मिक स्तरावरचे) होते. त्यामुळे त्या एकमेकींशी भांडत नसत. त्यांच्यात एकमेकींबद्दल प्रेमच होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.१.२०२२)
‘कर्मयोगात कृतीचा भाग अधिक असल्यामुळे तो शारीरिक स्तरावरील होतो. भक्ती ही मनाची अवस्था असल्यामुळे भक्तीयोग मानसिक स्तरावरील आहे, तर ‘ज्ञान’ हे बुद्धीशी संबंधित असल्यामुळे ज्ञानयोग बौद्धिक स्तरावरील होतो. त्यामुळे कर्मयोग आणि भक्तीयोग यांच्या तुलनेत ज्ञानयोग हा आचरण्यास कठीण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)
‘साधना करतांना साधकाने साधनेच्या स्तरावरील कितीही कृती केल्या, तरी ज्या वेळी त्याला आत्म्याच्या खर्या स्वरूपाचे ज्ञान होते, तेच सर्वश्रेष्ठ असते. हे ज्ञान विविध विद्यांच्या माध्यमांतूनच होत असते. ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१.२०२२)
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मनुष्य जन्माला आल्यापासून वयस्कर होईपर्यंत तो स्वकर्तृत्त्वाचा अभिमान, आप्तस्वकीय, विविध विषयांची आसक्ती अशा अनेक सांसारिक गोष्टींमध्ये मनाने पूर्णतः गुंतून जातो. या स्थितीत त्याला ‘मृत्यू नको’, असे वाटते. त्यानंतर म्हातारपणी विविध आजारपणांमुळे दुःख भोगायला लागते. त्यामुळे त्याला ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटते. त्यामुळे म्हातारपण हा एकप्रकारे मायेतून मुक्त करण्यासाठीचा देवाने दिलेला आशीर्वादच आहे, ज्यामुळे मनुष्य स्वतः … Read more
‘प्रत्येक मनुष्य प्रारब्ध भोगण्यासाठी जन्माला येत असतो. हे प्रारब्ध भोगण्यासाठीचे बळ केवळ कुलदेवतेचे दर्शन, तिचा नामजप करणे, कुलाचारांचे पालन यांसारख्या उपासनेमधून मिळत असते. यासाठी साधनेचा प्रारंभ कुलदेवतेच्या उपासनेपासूनच करावा. हा साधनेचा प्राथमिक नियम आहे, जो सर्वांसाठी सारखाच लागू पडतो. कुलदेवता ज्ञात नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’, असा तिचा नामजप करावा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले … Read more
‘आगगाडीने प्रवास करतांना एखाद्या प्रवाशाचे स्थानक आले की, तो उतरतो आणि परत कधी भेटत नाही. त्याप्रमाणे जीवन प्रवासात एखाद्याचे आयुष्य संपले की, त्याचा मृत्यू होतो आणि परत त्याची कधी भेट होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले