इंग्रजी भाषेची मर्यादा जाणा !

‘संपूर्ण जगात आज कुठेही गेलो, तर या भूतलावरील विविध विषय इंग्रजी भाषेतून शिकता येतात. त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. सर्व जण ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कलियुगात कर्मयोग अथवा ज्ञानयोग साधनामार्ग जवळचे का वाटतात ?

‘कलियुगात प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तोलून-मापून पाहिली जाते. परिणामी माणसाची श्रद्धा उणावली आहे. त्यामुळे साधनेत ‘श्रद्धा’ हा मूलभूत घटक असणार्‍या भक्तीयोगानुसार साधना करणे कठीण जाते. त्या तुलनेत कर्मयोग अथवा ज्ञानयोग हे बुद्धीने समजत असल्यामुळे सध्याच्या काळात हे साधनामार्ग सर्वसाधारण साधकांना जवळचे वाटतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)

अध्यात्म अनंताचे शास्त्र आहे !

आता माझे वय ७९ वर्षे आहे. गेली ४० वर्षे मी अध्यात्माचा अभ्यास केला. आताही प्रतीदिन ८-१० घंटे अभ्यास करत असतांना माझ्या लक्षात आले की, अध्यात्माच्या अनंत ज्ञानापैकी १ टक्का ज्ञानही मी अजून वाचलेले नाही ! याउलट विज्ञानाच्या एखाद्या शाखेत एखाद्याने पीएच्.डी. (डॉक्टरेट पदवी) मिळवली, तर तो स्वतःकडे अभिमानाने पहातो आणि ‘इतरांनीही महत्त्व द्यावे’, असे त्याला … Read more

देव केवळ भक्तांना साहाय्य करतो, तसे संत त्यांच्या कुटुंबियांना नाही, तर त्यांच्या भक्तांना साहाय्य करतात !

‘देवता सर्वच मनुष्यांना साहाय्य करत नाहीत. एखादी व्यक्ती त्या देवतेची भक्ती करू लागली की, ती देवता तिचे पूर्ण दायित्व घेते. त्या भक्ताच्या जीवनात येणार्‍या अडीअडचणींचा त्याच्या साधनेवर परिणाम होऊ नये; म्हणून देवता त्याला साहाय्य करते. संतांचे कार्यही असेच असते. संत त्यांच्या भक्तांच्या साधनेत खंड पडू नये, यासाठी त्यांना सर्वतोपरी साहाय्य करतात; पण ते कधीही ‘माझे … Read more

‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ म्हणजे काय ?

अध्यात्मात जे शिकलो, ते लगेच कृतीत आणणे, हेच ‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ आहे ! ईश्वराप्रती असलेल्या भावानेच अध्यात्मशास्त्र जाणता येते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे

अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे. अध्यात्मात शिकू तेवढे अल्प आहे. शिकण्यासाठी अनेक जन्मही अपुरे पडतील. त्यामुळे अध्यात्माचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा त्यामधील तत्त्व ओळखून त्यामागील शास्त्र जाणून घ्यायला हवे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

अध्यात्म सुंदर आहे

अध्यात्म सुंदर आहे. ते जगणे आणि अनुभवणे, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेणे ! -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

देव मिळाल्यावर काही मिळवण्याची आशा-आकांक्षा रहात नाही

आयुष्याच्या या साधना प्रवासात जेथे देव मिळतो, तेथे अजून काही मिळवण्याची आशा-आकांक्षा रहात नाही. देवाचे विश्व पुष्कळ सुंदर आणि अद्भुत् आहे. त्यात रमले की, कशाचीच आठवण येत नाही. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया संबंधित व्यक्ती अन् तिच्या संपर्कात येणा-यांनाही आनंद देणारी असते !

‘व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा विविध स्तरांवर हानी सहन करावी लागते. ही हानी त्याच्यापुरतीच मर्यादित न रहाता तिचे दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या संपर्कात येणार्‍यांनाही सहन करावे लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास त्याचा लाभ केवळ त्या व्यक्तीपुरताच मर्यादित न रहाता तिच्या संपर्कात येणार्‍यांनाही होतो. त्याचप्रमाणे … Read more