जीवनातील विविध समस्यांवर उपवास, तीर्थयात्रा नव्हे, तर ‘साधना’ हाच खरा उपाय !

‘द्वापर आणि त्रेता युगांत सर्वसामान्य व्यक्तीही सात्त्विक होती. त्या काळात आयुष्यमानही अधिक होते. त्यामुळे जीवनातील शारीरिक, मानसिक, आर्थिक यांसारख्या समस्यांसाठी उपवास, तीर्थयात्रा यांसारख्या कर्मकांडाच्या स्तरावरील उपायांसाठी वेळ देणे त्यांना शक्य होते. त्यातून त्यांच्या अडचणी सुटतही होत्या. अडचणी सुटल्या की, उरलेला वेळ साधनेला देणे शक्य होते.

सध्या कलियुगात मनुष्य रज-तम प्रधान आहे आणि त्याचे आयुमानही अल्प आहे. त्यामुळे आता मनुष्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपवास, तीर्थयात्रा यांसारख्या कर्मकांडाच्या स्तरावरील उपाय केले, तरी अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. हे उपाय क्षयरोग झाल्यावर खोकल्यासाठी औषध देण्यासारखे वरवरचे ठरतात. काळानुसार या समस्यांच्या निवारणासाठी त्यांच्या प्रारब्ध, पूर्वजांचा त्रास, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी मूळ कारणांवर उपाय करणे आवश्यक असते. यामुळे सनातनमध्ये कुणालाही शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्यांसाठी उपाययोजना सांगितल्या जात नाहीत, तर केवळ मूळ कारणांवरील उपाय म्हणून आवश्यक ती साधना शिकवली जाते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.९.२०२१)

Leave a Comment