बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, अध्यात्मात बुद्धीला महत्त्व नाही, तर बुद्धीलयाला महत्त्व आहे, हे प्राथमिक तत्त्व समजून घ्या !

बुद्धीप्रामाण्यवादी बालवाडी किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश देतांना वय पहातात. अध्यात्मात वयानुसार नाही, तर पात्रतेनुसार शिक्षण मिळते, उदा कु. वैभवी भोवर (वय १६ वर्षे), सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ५१ वर्षे) आणि डॉ. अजय जोशी (वय ५८ वर्षे) हे आज एकाच दिवशी ६१ टक्के पातळीचे झाले. एवढेच नव्हे, तर शाळेत कधीही न गेलेला अन् शारीरिकदृष्ट्या अपंग … Read more

साधनेत केवळ तन-मन-धनाचा त्याग पुरेसा नाही, तर इतरही अनेक गुण हवेत !

साधनेत तन-मन-धनाचा त्याग केला की झाले, असे बर्‍याच ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकांना आणि काही संतांनाही वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, साधनेत पुढे जायची तळमळ, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती, प्रीती आणि समष्टीतील नेतृत्व इत्यादी गुणही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय पुढील प्रगती होणे अशक्य आहे. एवढेच नव्हे, तर या गुणांशिवाय अधोगतीही होऊ शकते. – डॉ. … Read more

देवघरात देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती ठेवू नका !

‘काही जणांकडे ३-४ पिढ्यांपूर्वीचीही देवघरातील देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती पूजेत ठेवलेली असतात. चित्रे आणि मूर्ती जुनी झाल्यामुळे त्यांच्यातील देवतेचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अल्प झालेली असते. एवढेच नव्हे, तर काही वेळा त्यांतून त्रासदायक स्पंदनेही प्रक्षेपित होतात. भावनाप्रधानतेमुळे अशी चित्रे आणि मूर्ती देवघरात ठेवण्यात येतात. अशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरातील मूर्तीचीही … Read more

स्वसंरक्षण करण्यासाठी साधनेचे महत्त्व

शिरस्त्राण, चिलखत इत्यादी स्थुलातून आक्रमण झाल्यास त्या त्या भागाचे रक्षण करतात. साधनेमुळे संरक्षककवच निर्माण होते. ते स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरच्या आक्रमणांपासून पूर्ण देहाचे आणि मनाचे रक्षण करते. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))

नामजपात वैखरी वाणीचा लाभ

आपण नेहमी बोलतो, त्या वाणीला वैखरी वाणी म्हणतात. साधनेत नामजप करतांना वैखरीतून मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणींत जप करत करत पुढे जायचे असते. हे साध्य करणे सुरुवातीला कठीण असते. तेव्हा वैखरी वाणीत जप करतांना जप ऐकू येत असल्यामुळे जपावर मन एकाग्र व्हायला साहाय्य होते. त्यामुळे पुढच्या वाणींतील जप करणे सुलभ होते. – डॉ. आठवले … Read more

सनातन प्रभातमध्ये दृश्य जगाबरोबर अदृश्य जगाबद्दलही माहिती देण्याचे कारण

‘सनातन प्रभातमध्ये दृश्य जगाबरोबर अदृश्य (सूक्ष्म) जगाबद्दलही माहिती देण्यात येते; कारण दृश्य जगातील घटनांसाठी अदृश्य जगातील घटना कारणीभूत असतात व ‘दृश्य जग सुखी करायचे असेल, तर अदृश्य जगातील घटनांबद्दल उपाय केले पाहिजेत’, याची जाणीव मानवाला व्हावी.’ – डॉ. आठवले (२६.५.२००७, दुपारी १२.०५ )

भक्तीसाठी प्रल्हादाला आदर्श मानण्याचे कारण

नरसिंहाचे रूप पाहून कोणालाही भीती वाटेल आणि तो दूर पळेल; पण छोटा प्रल्हाद भक्त असल्यामुळे चराचरात श्रीविष्णुला पहात होता. त्यामुळे तो नरसिंहाला घाबरला नाही. यावरून लक्षात येते की, प्रल्हादासारखी भक्ती केली, तरच भगवंत आपल्यालाही वाचवील. – डॉ. आठवले (१७.२.२०१४)

कुटुंबात होतात, तशी भांडणे सनातनच्या आश्रमांत शेकडो साधक एकत्र रहात असूनही होत नाहीत !

एखाद्या कुटुंबात फक्त नवरा-बायको असले, तरी त्यांची आपसात भांडणे होतात. एकत्र कुटुंबात २० – २५ जण असले, तरी भांडणे होतात; मात्र सनातनच्या देवद आणि रामनाथी येथील आश्रमांत शेकडो साधक एकत्र रहात असूनही त्यांच्यात भांडणे होत नाहीत. यावरून साधनेचे महत्त्व लक्षात येते. – डॉ. आठवले (२०.२.२०१४)

मानवाचा एक क्रमांकाचा शत्रू म्हणजे विज्ञान, तर एकमेव तारक म्हणजे अध्यात्म !

१. ‘विज्ञान मानवाला सुखलोलूप बनवते आणि मायेत अधिकाधिक अडकवते, तर अध्यात्म सुखाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देते, म्हणजेच त्याची मायेपासून सुटका करते. २. विज्ञान बुद्धीचा अहंकार वाढवते, तर अध्यात्म बुद्धीलय आणि अहंलय करण्यासाठीची साधना शिकवते.’ – डॉ. आठवले (पौष शुक्ल पक्ष ९, कलियुग वर्ष ५११४ (२०.१.२०१३))

गुरुंकडून ज्ञान मिळवण्यापेक्षा त्यांची सेवा करणे जास्त महत्त्वाचे !

‘अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. शिष्य जेव्हा गुरूंकडून ज्ञान मिळवतो, तेव्हा तो त्याग करण्याऐवजी काहीतरी मिळवत असतो. याउलट सेवा करतांना तन व मन यांचा त्याग होतो; म्हणूनच जिज्ञासूपेक्षा सेवा करणारे शिष्य गुरूंना जास्त आवडतात.’ – डॉ. आठवले (२३.७.२००७, सायं. ६)