सौंदर्य वर्धनालयात (ब्युटीपार्लरमध्ये) जाणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

१. सौंदर्य वर्धनालयात जाणे म्हणजे स्थूलदेहात अडकणे आणि दुसर्‍यांनी आपल्याला सुंदर म्हणावे, अशी बहिर्मुखता निर्माण होणे

२. मनोरुग्ण स्थूलदेहात अडकू नयेत; म्हणून मी माझ्या चिकित्सालयात Beautiparlour for Mind म्हणजे मनाचे सौंदर्य वर्धनालय असा फलक लावला होता.

३. उपचारामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले की, व्यक्तीचे स्वतःच्या चेहर्‍याकडे विशेष लक्ष जात नाही.


४. भावामुळे सौंदर्य खर्‍या अर्थाने वाढते.

५. कितीही वयाचे संत असले, तरी त्यांच्या आध्यात्मिक स्तरामुळे, त्यांच्यातील सात्त्विकतेमुळे त्यांच्याकडे पाहून चांगले वाटते. येथे वयाचा संबंध येत नाही.

६. देवदेवता सुंदर दिसतात. याचे कारण मुळात निर्गुण स्थितीत असलेल्या देवता सगुण स्थितीत आल्या, तरी त्यांच्यात सत्त्वप्रधानता असते.
यातून शिकण्याचे सूत्र हे की, सौंदर्य वर्धनालयात शेकडो ते हजारो रूपये खर्च करून मायेतील तात्पुरते सौंदर्य मिळवण्यापेक्षा विनामूल्य असणारी साधना करून चिरंतन आध्यात्मिक सौंदर्य प्राप्त करणे निश्‍चितच श्रेयस्कर आहे. – डॉ. आठवले (आषाढ कृष्ण पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (२७.७.२०१३))

Leave a Comment