बुद्धीप्रामाण्यवादी बालवाडी किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश देतांना वय पहातात. अध्यात्मात वयानुसार नाही, तर पात्रतेनुसार शिक्षण मिळते, उदा कु. वैभवी भोवर (वय १६ वर्षे), सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ५१ वर्षे) आणि डॉ. अजय जोशी (वय ५८ वर्षे) हे आज एकाच दिवशी ६१ टक्के पातळीचे झाले. एवढेच नव्हे, तर शाळेत कधीही न गेलेला अन् शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने जन्मापासून अंथरुणाला खिळून असलेला आणि मानसिकदृष्ट्याही अपंग वाटणारा कु. सौरभ जोशी आजच ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदाला पोहोचला ! – डॉ. आठवले (३१.८.२०१३)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !