शांतीच्या लहरी संदर्भात स्पष्टीकरण

सनातनच्या ग्रंथांतील सूक्ष्म-परिक्षणात काही ठिकाणी शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो. शांती निर्गुणाशी संबंधित असतांना शांतीच्या लहरी कशा असतील ?, असे काही जणांना वाटते. ते योग्यही आहे. प्रत्यक्षात निर्गुणाच्या स्थितीला गेल्यावर, म्हणजे अद्वैतात गेल्यावर शांतीची अनुभूती आली, असे सांगणाराही उरत नाही. शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो, तो ३० टक्क्यांहून अधिक शांती अनुभवणार्‍या साधकांना आलेला अनुभव असतो. त्यांना शांती बाहेरून आत येत आहे किंवा आत निर्माण होत आहे, अशा तर्‍हेची अनुभूती येते. त्यामुळे ते चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींप्रमाणे शांतीच्या लहरी, असा उल्लेख करतात. – डॉ. आठवले (चैत्र कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११५ (८.५.२०१३))

Leave a Comment