साधना म्हणून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य केल्यास ईश्‍वर स्वतःहून साहाय्य करतो !

व्यवहारात कोणाचे साहाय्य हवे असल्यास त्यांना कार्याविषयी बरीच माहिती सांगावी लागते किंवा कोणाच्या तरी ओळखीने त्यांना भेटलो, तरच ते साहाय्य करण्याचा विचार करतात. याउलट संतांकडे गेल्यावर त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ही नावे सांगितली, तरी साधकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या साधनेमुळे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयामुळे ते पुरेसे असते. खरे म्हटले, तर संतांना काहीच … Read more

हस्तसामुद्रिकांना भोंदू म्हणणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, बुद्धीने एवढे तरी समजून घ्या !

मनाचा शरिरावर आणि शरिराचा मनावर परिणाम होतो; म्हणूनच मनाच्या काळजीने आम्लपित्त, रक्तदाब इत्यादी शारीरिक विकार होतात आणि शारीरिक विकारामुळे मनाला निराशा येणे इत्यादी विकार होतात. मनाचा शरिरावर परिणाम होत असल्यामुळे परिणाम होणार्‍या इतर अवयवांप्रमाणे हात आणि पाय यांच्यावरही परिणाम होऊन त्यांवरील रेषांतही पालट होतात. ते पालट केवळ या जन्मातील घटनांच्या संदर्भातील नसून जन्मोजन्मी तेच मन … Read more

हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.

भावार्थ : ‘हे असे आहे का ?’ मधील ‘हे’ मायेविषयी आहे. ‘ते तसे आहे का ?’ मधील ‘ते’ ब्रह्मासंबंधी आहे. ‘हे असेही नाही, तसेही नाही’, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि ‘तशीही नाही’ म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ‘ते कशात नाही ?’ म्हणजे ब्रह्म सर्वत्र … Read more

सतत वर्तमानकाळात रहाणे

आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो. भावार्थ : ‘कर्म मागे’ म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करत नाही. ‘धर्म आमच्या पुढे असतो’ म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. ‘आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो’ म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’)

एखाद्या विषयाच्या संदर्भात पाश्‍चात्त्य विचारसरणी आणि भारतीय (हिंदु) विचारसरणी यांत भेद असला, तर हिंदु विचारसरणी सत्य समजा !

याचे कारण हे की, हिंदु विचारसरणी लाखो वर्षांची आहे, उदा. सूर्यस्नान कधी करावे ?, याची वेळ पाश्‍चात्त्य सकाळी १० नंतर अशी सांगतात, तर हिंदु धर्मात कोवळ्या उन्हाची, म्हणजे सकाळी ९ च्या आधीची वेळ सांगितली आहे. तसेच हिंदु विचारसरणीत कधीही पालट होत नाहीत, तर पाश्‍चात्त्य विचारसरणीत काही वर्षांतच पालट होतात, उदा. वैज्ञानिक नवीन सिद्धांत सांगतात. – … Read more

साधना

वेद म्हणतात, तो (भगवंत) बृहद् झाला आहे. भगवंत विविध रूपांतून प्रकट होतो. माझ्या साहाय्यासाठी सर्व वस्तू आणि प्राणी आहेत. पहाण्याची दृष्टी पालटली पाहिजे. भगवंत माझ्यामधून कार्य करतो. माझी स्तुती ही भगवंताची स्तुती आहे; म्हणून त्याची बदनामी होऊ नये, असे वागणे म्हणजे साधना होय. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.८.२०१४) देवाण-घेवाण ‘आपण दुसर्‍याला … Read more

सांप्रदायिक साधना करणार्‍यांनो, धर्माचाही अभ्यास करा !

सांप्रदायिक साधना करणार्‍यांना त्यांचा संप्रदाय सोडून हिंदु धर्मासंदर्भात इतर काहीच माहिती नसते. त्यामुळे कोणी अध्यात्मातील प्रश्‍न विचारायला लागला, तर त्यांना उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळे प्रश्‍न विचारणार्‍याला वाटते, यांच्या साधनेत काही अर्थ नाही. असे व्हायला नको यासाठी, तसेच समाजातील व्यक्तींना साधनेकडे वळवण्यासाठी, म्हणजेच समष्टी साधना करण्यासाठी अध्यात्माच्या विविध अंगांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. – (प.पू.) … Read more

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात समाजात होत जाणारे विविधांगी आमूलाग्र पालट

भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यानंतर पुढील ५० वर्षांत हिंदु समाजात विविधांगी आमूलाग्र पालट होतील. हे पालट अभ्यासल्यानंतर हिंदु राष्ट्रातच मानवाची खरा विकास किंवा प्रगती होईल, असे आज म्हणता येईल. १. सामाजिक समस्यांचे निर्मूलन १ अ. गुंडगिरी, चोर्‍या, दरोडे, हत्या, बलात्कार आदी गुन्हेगारीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल. १ आ. उपासमारी, कुपोषण आदींचे प्रमाण टप्प्याटप्प्याने … Read more

त्याग केल्यावर ईश्‍वरप्राप्ती होते !

साठवण्याने जडत्व येते. आपल्याकडे आहे त्या तन-मन-धन या सर्वांचा अधिकाधिक त्याग करण्याने हलकेपणा येत जातो. त्यामुळे वर वर देवाच्या दिशेने साधकाची प्रगती होते. शेवटी सर्वस्वाचा त्याग केला की, ईश्‍वरप्राप्ती होते. – (प.पू.) डॉ. आठवले (२५.८.२०१४) ज्या साधकांची साधना ईश्‍वरप्राप्तीसाठी असते, त्यांना एखाद्या संस्थेतील, संघटनेतील, पक्षातील पद, तसेच लोकप्रतिनिधीपद, मंत्रीपद किंवा अगदी पंतप्रधानपद यांची ओढ असेल … Read more

यश मिळण्यास आरंभ होण्याचे आणि ते टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण

हिंदु राष्ट्रासाठीच नव्हे, तर कोणत्याही उपक्रमासाठी प्रयत्न करण्याचा स्तर आणि यश मिळण्याचे, तसेच यश मिळण्यास आरंभ होण्याचे आणि ते टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण प्रयत्न करण्याचा स्तर यश मिळण्याचे तुलनात्मक प्रमाण (टक्के) यश मिळण्यास आरंभ होण्याचा तुलनात्मक कालावधी यश टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण (टक्के) १. शारीरिक ३० अल्प ५ २. मानसिक ५० मध्यम ३० ३. आध्यात्मिक १०० अधिक … Read more