कुटुंबपद्धती नसण्याने होणारे तोटे

अ. स्त्री-पुरुषांना कायद्याने समान हक्क देण्याने कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांचा विध्वंस !

स्त्री आणि पुरुष यांच्यातील अंतर मिटवण्याचा सहेतुक प्रयत्न झाला, तर त्याचा परिणाम दुःख आणि व्याधीत होणे अपरिहार्य आहे. सर्वच क्षेत्रांत स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क देण्यासंबंधीचा आग्रह धरण्याने आणि तसे कायदे करण्याने कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचाही विध्वंस होईल.

आ. स्त्रीला पुरुषी बनवू पहाणारे सैतानी पुरोगामी, समाज आणि राष्ट्र यांचे प्राण घेतील !

स्त्रीला पुरुषी बनवू पहाणारे, स्त्री-पुरुष समानतेच्या मृगजळाच्या मागे समाजाला धावायला लावणारे हे सैतानी (ism mongers) पुरोगामी आहेत. त्या भयंकर विळख्यात (dogmas) ते समाज आणि राष्ट्र यांचे नरडे आवळून प्राण घेतील.

इ. कुटुंबे नसल्याने स्वार्थत्यागाला फाटा मिळून विद्यानिष्ठा, देशभक्ती आणि तत्त्वनिष्ठा यांचा अभाव !

कुटुंबे नसल्याने स्वार्थत्याग, सेवा, सहकार्य, एकीचे सामर्थ्य, हे सगळे आता हद्दपार होत आहेत. मध्यमवर्गियांची जीवनमूल्येच वाळीत टाकली जात नाहीत ना ? साधी राहणी आणि मर्यादित गरजा आता उरल्या नाहीत. त्यामुळे स्वार्थत्यागाला फाटा मिळाला. पूर्वीची विद्यानिष्ठा, देशभक्ती आणि तत्त्वनिष्ठा आता उरली नाही. हल्ली वचन मोडतांना कोणालाच काही वाटत नाही.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ) (स्त्री धर्म – ८, स्त्री काल आणि आज, पृ. ७,९ आणि १५.)

Leave a Comment