मनापासून विषयांचा त्याग केल्यासच प्रगती होणे

एकदा संत तुकारामांनी आपल्या पत्नीस बराच वैराग्यपर उपदेश केला आणि विषय कसे वाईट आहेत, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. उपदेश ऐकून तिच्या मनात वैराग्य आले. दुसऱ्या दिवशी तिने स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. घरात काही एक ठेवले नाही. दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून ती विचारात … Read more

संतांच्या कार्य करण्याच्या पद्धती

काही संत त्यांच्या गुरूंकडून आदेश आल्यावर त्याप्रमाणे कार्य करतात, तर काही संत कार्यासंदर्भात काही प्रश्‍न असल्यास ते गुरूंना सूक्ष्मातून विचारून लगेच उत्तर मिळवतात आणि त्याप्रमाणे कार्य करतात. त्यामुळे त्यांना कार्य लगेच करता येते. – डॉ. आठवले (१८.५.२०१४)

गुरुपादुकांचे मूल्य प्राणापेक्षाही अधिक असणे

एका भक्ताला गुरूंचे दर्शन झाले नाही. दुसरा भक्त गुरूंना भेटला, तेव्हा गुरूंनी त्याच्या पुत्राच्या विवाहानिमित्त त्याला पादुका दिल्या. त्याने हे पहिल्या भक्ताला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘मला गुरूंच्या पादुका दे, मी तुला माझी जीवनभराची मिळकत देतो.’ दुसऱ्या भक्ताने त्याला पादुका दिल्या. पहिल्या भक्ताने पादुका हृदयाला लावल्या आणि तो नाचू लागला. गुरूंना हे समजल्यावर त्यांनी पहिल्या भक्ताला … Read more

राजकारण्यांच्या सभा व संतांच्या सभांमधील प्रमुख भेद !

राजकारण्यांना सभेला माणसे पैसे देऊन आणावी लागतात, तर संतांच्या सभांना आणि दर्शनाला हजारो, लाखो येतात आणि अर्पणही देतात ! – डॉ. आठवले (१७.५.२०१४)

साधनेची अत्यावश्यकता !

आपण स्वतःलाच जिथे साधनेशिवाय जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही, तिथे भारतमातेला आणि हिंदु धर्माला आक्रमकांपासून काय मुक्त करणार ? – डॉ. आठवले (१५.५.२०१४)

मतदान करावे लागणारी ही शेवटची निवडणूक ठरो !

विज्ञानाने मानवाचा अभ्यास करणारी अनेक यंत्रे शोधली आहेत. पुढे त्रिगुणांपैकी व्यक्तीतील प्रधान गुण दर्शवणारे यंत्र शोधले की, निवडणुकीला उभे असणार्‍यांपैकी सात्त्विक कोण ?, हे यंत्र दर्शवील. तो उमेदवार निवडणुकीत जिंकला, असे जाहीर करण्यात येईल. त्यामुळे लोकांना खोटी आश्‍वासने देऊन निवडून येता येणार नाही आणि निवडणुकांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च राष्ट्रासाठी वापरता येईल. – डॉ. आठवले … Read more

धर्मशिक्षणाची अत्यावश्यकता !

ख्रिस्ती प्रसारक हिंदूंच्या मनात ख्रिस्ती पंथासंदर्भात श्रद्धा निर्माण करू शकतात, तर जन्महिंदूंच्या मनातही हिंदूंना श्रद्धा निर्माण करता येत नाही; कारण ते धर्मशिक्षण देत नाहीत. – डॉ. आठवले (१५.५.२०१४)

कुठे स्त्रियांना आधार वाटणारा ब्रह्मचारी डाकू जोगीदास, तर कुठे हल्लीचे राज्यकर्ते !

भूजमध्ये जोगीदास नावाच्या डाकूचा खूप दबदबा होता. भूजचा राजाही त्याला घाबरत असे. डाकू असूनही त्याने ब्रह्मचर्य व्रत घेतले होते. एका रात्री एक कामातूर युवती जोगीदासकडे आली. जोगीदास तिच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘माते परत जा’. एकदा घोड्यावर बसून गावात फेरफटका मारत असतांना सकाळी शेतात १८ वर्षांची एक सुंदर युवती एकटीच काम करत होती. जोगीदासने विचारले, … Read more

रावण आणि रामनाम

सीता वश होत नाही; म्हणून रावण खूप अस्वस्थ झाला. त्याने कुंभकर्णाला उठवले. कुंभकर्ण रावणाला म्हणाला, ‘तू श्रीरामाचे रूप घे’. रावण म्हणाला, ‘श्रीरामाचे नाव घेतले, तरी सीता बहिणीसारखी वाटते. मग श्रीरामाचे रूप घेतले, तर मीच सीतामय होईन’. जाण्याची ठिकाणे अनेक, तर यायचे ठिकाण एकच ! श्रीकृष्ण नारदाला सांगतो, “तू वृंदावनात जा, वैकुंठाला जा, पाताळात जा. जाण्याची … Read more

प्रेम

अ. पालकांचे मुलाविषयीचे प्रेम सात्त्विक असते. त्यांच्यात स्वार्थ नसतो. मुलाची उत्पत्ती, स्वभाव, कर्तव्ये, धैर्य, बुद्धी, स्मरण, जाणीव इत्यादी चांगले राखणे हे माता-पिता यांना देवाचे वरदान आहे. आ. संत, साधू किंवा देव यांच्या कृपेनेच केवळ माणसाचे देवाविषयीचे प्रेम वृद्धींगत होते. इ. ज्या प्रमाणात लैंगिक इच्छा न्यून होतात, त्या प्रमाणात देवावरचे प्रेम भरपूर होते. जेव्हा लैंगिक इच्छा … Read more