संकल्पाप्रमाणे सुख-दुःखे

केली एकचि जगदीशाने अस्थिमांसमय नारी

भिन्न भिन्न जीवांसि परी ती झाली भिन्नाकारी ।

भाच्या मामी, पतिला पत्नी, पुत्रा होई माता

भावा भगिनी, दिरास वहिनी, कन्या होई ताता ॥ (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : देवाने स्त्री निर्माण केली. ती वडिलांना वात्सल्यसुख, पतीला शृंगारसुख, मुलाला मातृसुख, भावाला भगिनीसुख, दिराला वहिनीसुख देते. स्त्री एकच असली, तरी तिच्यापासून नाना सुखे आणि दुःखे आपल्या संकल्पानुसार मिळतात, मग खरे सुख कोणते ?

अहंकार : जे जे माझे आहे, ते मला सुख देते, उदा. ‘माझी मालमत्ता’, ‘माझा पैसा’. ‘माझी अधिकोषातील शिल्लक इतकी आहे’, ही कल्पनासुद्धा सुख देते. माझे घर, माझा मुलगा, माझी बायको, माझे सौंदर्य, माझी विद्वत्ता, माझी कीर्ती जोपर्यंत मला अनुकूल आहेत, तोपर्यंत सुख देतात. तोच पैसा चोरीला गेला, घराला आग लागली, मुलगा ऐकेनासा झाला, स्वतःच्या विद्वत्तेला आव्हान दिले, कीर्तीला कलंक लागला, तर तितकेच दुःख होते.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment