रावण आणि रामनाम

सीता वश होत नाही; म्हणून रावण खूप अस्वस्थ झाला. त्याने कुंभकर्णाला उठवले. कुंभकर्ण रावणाला म्हणाला, ‘तू श्रीरामाचे रूप घे’. रावण म्हणाला, ‘श्रीरामाचे नाव घेतले, तरी सीता बहिणीसारखी वाटते. मग श्रीरामाचे रूप घेतले, तर मीच सीतामय होईन’.

जाण्याची ठिकाणे अनेक, तर यायचे ठिकाण एकच !

श्रीकृष्ण नारदाला सांगतो, “तू वृंदावनात जा, वैकुंठाला जा, पाताळात जा. जाण्याची ठिकाणे अनेक आहेत; पण परत यायचे ठिकाण एकच ते म्हणजे श्रीकृष्ण !”

ब्रह्मचर्याची शक्ती !

नेपोलियन बोनापार्ट खेडेगावात एका न्हाव्याच्या घरी रहात होता. न्हाव्याची बायको कामातूर होऊन नेपोलियनवर फिदा झाली होती; पण नेपोलियनने तिला दाद दिली नाही. नेपोलियन राजा झाल्यावर न्हाव्याकडे वेश बदलून गेला. न्हाव्याच्या बायकोला भेटला आणि तिला विचारले, “नेपोलियन कसा होता ?” न्हाव्याची बायको म्हणाली, “अगदी रुक्ष, षंढ !” नेपोलियन म्हणाला, “माझ्या कमरेची ताकद तुझ्यात घालवली असती, तर आज सेनापती बनलो नसतो. माझ्या कमरेची ताकद शत्रूंशी लढण्यात घालवली; म्हणून आज मी राजा झालो.”
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द २०१०)

Leave a Comment