बुद्धी

माणूस बुद्धीमान आहे. त्याची जिज्ञासा, नवीन गोष्टी जाणण्याची इच्छा जोपर्यंत पुरी होत नाही, तोपर्यंत तो समाधानी नसतो. उत्सुकता हा त्याचा स्वभाव आहे. अज्ञान झाल्याने त्याला सुख मिळते.

बुद्धीची दुःखे

अ. माझी लैंगिक वासना अजून नाहीशी का होत नाही ?

आ. मला अजून देवदर्शन का होत नाही ?

अध्यात्माची आवश्यकता

दुःखाचे मूळ कारण जाणून त्यापासून कायमची सुटका होण्यासाठी अध्यात्मशास्त्र हा एकच मार्ग आहे.

जर

१. जगात दुःखच नसते.

२. दुःखापासून मुक्त होण्याची लोकांना इच्छा नसती.

३. दुःखापासून मुक्त होण्याची उत्कट इच्छा असूनही मुक्त होणे अशक्य असते.

४. अध्यात्माने दुःख कायमचे नाहीसे होत नसते.

५. दुःखापासून कायम मुक्त होण्यासाठी अध्यात्माशिवाय अधिक सुलभ मार्ग असता,

तर संसारात मग्न असलेल्या मनुष्याला अध्यात्मासारखा विषय समजून घेण्यासाठी धडपड करण्याची जरुरी नसती.

प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतो; परंतु प्रत्येक सुखाबरोबर दुःखसंमिश्रित असते. जसजसे सुख अधिक भोगावे, तसतशी सुखाची हाव वाढतच जाते; म्हणून माणसाने सुखाचे सत्यस्वरूप कळण्यासाठी अध्यात्मातील दर्शने समजून घेऊन त्यांचा अभ्यास करावा.

जगात दुःख नसते, तर आपण उन्मत्त झालो असतो.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment