साधना केल्याने आयुष्यभर आनंद मिळतो !
‘जेवतांना आवडीचे पदार्थ खातांना थोडा वेळ सुख मिळते. वासनेचे सुखही काही तासच टिकते. याउलट साधना करणार्याला आयुष्यभर आनंद मिळतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०२१)
‘जेवतांना आवडीचे पदार्थ खातांना थोडा वेळ सुख मिळते. वासनेचे सुखही काही तासच टिकते. याउलट साधना करणार्याला आयुष्यभर आनंद मिळतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०२१)
‘बरेच संत त्यांच्याकडे येणार्या भक्तांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या अडचणी सोडवण्यावर भर देतात. वस्तुतः या सर्व समस्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार किंवा त्याला असणार्या वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत असतात. त्यावर मूळ उपायोजना म्हणजे संबंधितांनी साधना करणे. संतांनी स्वतःची साधना खर्च करून त्यांच्या भक्तांच्या अडचणी दूर केल्या, तर तो भक्त परावलंबी होतो आणि प्रारब्धभोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माला … Read more
साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.१२.२०१९)
आजारी साधकाने त्याची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय करायलाच हवेत. त्याशिवाय वैद्यकीय उपचारही करायला हवेत, तरच लवकर बरे वाटते. साधना करतांना सर्वकाही देवावर सोडून उपयोगाचे नाही; आपले क्रियमाणही वापरले पाहिजे, तरच योग्य पद्धतीने साधना केल्यासारखे होते. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२०.१२.२०१९)
‘बहुतेकांना पुष्कळ प्रयत्न करूनही गुरुप्राप्ती होत नाही. याउलट अर्जुनाला काही प्रयत्न न करता श्रीकृष्णासारखा गुरु लाभला, म्हणजे त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असेल, हे लक्षात येते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)
‘श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदाच आणि काही श्लोकांतच गीता सांगितली अन् अर्जुनाला ती कळली. यावरून अर्जुनाची क्षमता किती असेल, ते लक्षात येते. आपण गीता अनेकदा वाचूनही आपल्याला ती कळत नाही. त्यामुळे त्यानुसार आचरण करणे, तर दूरचीच गोष्ट झाली !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)
‘जे आध्यात्मिक क्षमता नसल्याने संतांचे ‘संतत्व’ ओळखू शकत नाहीत, त्यांनी संतांना ‘ते संत नाहीत’ असे म्हणणे, हे वैद्यकीय शिक्षण नसणार्याने एखाद्या वैद्यांना ‘ते वैद्य नाहीत’, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)
‘अनेक जण संतांचे चरित्र वाचतात, तर काही जण त्याची पारायणेही करतात. यात लक्षात घेतले पाहिजे की, संतांचे चरित्र वाचले, तर त्यातून ‘केवळ त्यांनी साधना कशी केली’, हे समजते. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी चमत्कार केल्याचा उल्लेख असेल, तर त्यातून आपल्या मनात केवळ त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होतो. त्यांची शिकवण अभ्यासली, तरच आपली साधनाही त्यांच्यासारखी होऊ शकते आणि आपल्या … Read more
१. कमी आध्यात्मिक पातळीचे : ‘मी हा चमत्कार घडवला’, असे वाटून त्यांचा अहंकार वाढतो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी अल्प होत जाते. २. अधिक आध्यात्मिक पातळीचे : ‘ईश्वराने हा चमत्कार घडवला’, याची जाण असल्याने त्यांचा ईश्वराप्रतीचा भाव वाढत जातो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढत जाते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१०.२०२१)
१. शिकण्याची स्थिती ‘सत्संग, बैठक, प्रसार, संपर्क अथवा एखादी सेवा केल्यानंतर ‘मला काय शिकायला मिळाले ?’, असा विचार माझ्या मनात लगेच येतो का ?’, असा विचार मनात येणे, म्हणजेच शिकण्याच्या स्थितीत रहाणे होय. हे साधनेला अत्यंत पोषक आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अनंत काळ शिकत राहिले, तरी शिकणे पूर्ण होऊ शकत नाही. भगवंत साधकांना … Read more