प.पू. गुरुमाऊलीने सनातनच्या संतांना दिलेली शिकवण

समाजातील संत मानसन्मान आणि हेवेदावे यांत गुंतलेले असतात. याउलट प.पू. गुरुमाऊलीने सनातनच्या संतांना साधी राहणी आणि निष्काम भाव यांची शिकवण देऊन आत्मिक शक्ती दिली आहे. ती ते केव्हाही वापरू शकतात. गुणातीत शक्ती त्रिभुवनाला पुरेशी होते.’ आत्मानुसंधान ‘आत्म्याशी संबंध म्हणजे आत्मानुसंधान ! सूक्ष्मातून संधान साधणे, म्हणजे सर्व चैतन्यमय असल्याची अनुभूती घेणे.’

अध्यात्मशास्त्र अनंताचे शास्त्र आहे

‘अध्यात्मशास्त्र अनंताचे शास्त्र आहे; म्हणून देवाशिवाय ते कोणी सांगू शकत नाही. हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्र देवांनीच सांगितलेले असल्यामुळे ते अनंत आहे.’

अध्यात्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत आहे

अध्यात्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत असल्यामुळे सनातन संस्थेमध्ये प्रत्येकाला त्याच्या आवश्यकतेनुसार साधना सांगितली जाते. वैद्य ज्याप्रमाणे प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेनुसार उपचार सांगतात, त्याप्रमाणे हे आहे.’

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’

संकटसमयी आपल्याला साधनेच्या साठ्याचेच साहाय्य होते.

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भक्त भगवान होतो कि दोघे विभक्तच रहातात ?

‘भक्ती हा अहंकार तोडण्याचा विधी, अभ्यास आहे; परंतु भक्तीमार्गांत द्वैत ठेवण्याची प्रथा आहे म्हणजे ‘भक्त नेहमी परमेश्‍वराच्या पायाशीच शरण असला पाहिजे’, असे सांगतात. याचे कारण अज्ञानी भक्ताला सांगितले की, तू भगवानच आहेस, तर त्याचा अहंकार वाढेल. प्रत्यक्षात मात्र भक्त भगवान होतो. भक्त असतांना तो अव्यक्त भगवानच असतो; परंतु भक्ताला ‘तू भगवान होऊच शकत नाहीस’, अशी … Read more

‘मी’पण नष्ट होणार असल्याने भगवंताशी एकरूप होण्याचे भय वाटणे

‘स्वतःचे ‘मी’पण नाहीसे करणे सर्वांत कठीण असते. कवीश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांनी एका कवितेत लिहिले आहे, ‘मी जन्मोजन्मी भगवंताचा शोध घेत होतो. एकदा भगवंताच्या दारी पोचलो. दार ठोठावणार इतक्यात घाबरलो; कारण भगवंताला भेटल्यानंतर माझा ‘मी’पणा नाहीसा होईल. मीच उरणार नाही तेव्हापासून मी भगवंताचा पत्ता ठाऊक असूनही ‘भगवंत नाही’, अशा ठिकाणी भगवंताचा शोध घेत भटकत असतो.’ – … Read more

एका कुटुंबातील एक व्यक्ती जरी साधनेत असेल, तरी तो साधक आणि त्याचे कुटुंब यांची मोठी पुण्याई असतेे !

‘कलियुगात साधना करणार्‍या व्यक्ती सापडणे कठीण आहे आणि साधना करणारे साधक भेटणे त्याहूनही कठीण आहे. एखाद्या कुटुंबातील एक साधक साधनेत असेल, तरी तो साधक आणि त्याचे कुटुंब यांची केवढी मोठी पुण्याई आहे. त्या पुण्याईला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्यासाठी आपल्याला त्या साधकांना भेटावे लागते.’