परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींचा त्रास असणाऱ्या साधकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन !

‘वर्ष २००० ते २००३ या काळात फोंडा येथील सुखसागर सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः साधकांसाठी सत्संग घेत असत. त्या वेळी नुकतेच वाईट शक्तींचे त्रास चालू झाले होते. साधकांना पुष्कळच त्रास होत होते. त्या कालावधीपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला ‘वाईट शक्तींचे जग कसे असते ?’ याविषयी माहिती द्यायला प्रारंभ केला. त्या वेळी त्यांनी घेतलेल्या सत्संगातील काही सूत्रे लिहून घेतलेला कागद नुकताच मला मिळाला. त्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासासंदर्भात सांगितलेली काही वाक्ये होती. ही वाक्ये अजूनही सर्व साधकांसाठी प्रेरणा देणारी आहेत. ती वाक्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१. ‘आपली अध्यात्मात किती तयारी झाली आहे’, याची परीक्षा वाईट शक्तींच्या माध्यमातून देवच घेत असतो.

२. स्वतःला होणार्‍या त्रासाकडे साक्षीभावाने पहाणे, हीच आपली साधना आहे.

३. सूक्ष्मातील गोष्टींकडे साक्षीभावाने पहाता यायला लागले की, मग वाईट शक्तींचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही आणि हे जमले की, आपला विजय निश्‍चित आहे, असे समजावे.’