साधकाने ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय न ठेवता ईश्वरप्राप्तीचे ध्येय ठेवून साधना करणे महत्वाचे !

‘देवाच्या नियोजनाप्रमाणे ईश्‍वरी राज्य जेव्हा यायचे, तेव्हाच येणार आहे. ती अपेक्षाही नको. साधकाने ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय ठेवून साधना करायला नको. ‘मला ईश्‍वर हवा आहे’, या ध्येयासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे. काळानुसार ईश्‍वरी राज्याची स्थापना होणारच आहे. त्यासाठी आपण वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. साधना करतांना साधकाची सात्त्विकता वाढल्यावर त्याचे फळ म्हणून आपोआपच ईश्‍वरी राज्याची स्थापना होणार आहे. साधकाने साधना करून मोक्षप्राप्ती करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी साधनेत ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय ठेवणे महत्त्वाचे आहे. ध्येयामुळे आपण चिंतनशील बनतो, आपल्या प्रयत्नांना गती मिळते आणि आपण कृतीशील होतो.’