कोणी छोटेसे साहाय्य केले, तरी साहाय्य घेणारा थँक यू (आभारी…

कोणी छोटेसे साहाय्य केले, तरी साहाय्य घेणारा थँक यू (आभारी आहे), असे म्हणतो; पण देवाने आपल्याला जन्म दिला, बालपणी संगोपन करायला आई-वडील दिले आणि जन्मभर आपली काळजी घेतली, तरी कोणालाच देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धान्य, कपडे, वीज, दूरभाष, प्रवास इत्यादी सर्वांसाठी पैसे द्यावे लागतात;…

धान्य, कपडे, वीज, दूरभाष, प्रवास इत्यादी सर्वांसाठी पैसे द्यावे लागतात; पण फुकट मिळणारे सूर्यकिरण आणि हवा यांबद्दल मानवाला देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हे शाळांना लज्जास्पद !

विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खाजगी शिकवण्या नव्हत्या. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अशिक्षिताने सूक्ष्म जंतू नाहीत, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच…

‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाचा मानवदेहधारी प्राणी बनवू नका !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्‍वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच तो खर्‍या अर्थाने मानव असतो, … Read more

क्षमा

चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलिस, प्रशासनातील व्यक्ती, राजकारणी आणि राज्यकर्ते एकदा तरी क्षमा मागतात का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे !

विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंच्या ज्योतिषशास्त्राचे महत्त्व

व्यक्तीगत ग्रहांवरून व्यक्तीचे कालमहात्म्य कळते, तर मेदनीय ज्योतिष आणि संख्याशास्त्र आदींवरून समष्टीचे कालमहात्म्य कळतेे, उदा. भारताचे भविष्य पहाण्यासाठी देशाचे नाव, देश स्वतंत्र कधी झाला ती कुंडली; एखाद्या संस्थेचे भविष्य पहाण्यासाठी संस्था स्थापन झाली त्या वेळेची कुंडली, संस्थेचे नाव, संस्था प्रमुखाचे नाव आणि त्याची कुंडली; एखाद्या कुटुंबाचे भविष्य पहाण्यासाठी कुटुंब प्रमुखाची कुंडली. यावरून ज्योतिषशास्त्रात भारत इतर … Read more

इतर संघटना कार्याचे वार्षिक आणि आर्थिक अहवाल सादर करतात, तर…

इतर संघटना कार्याचे वार्षिक आणि आर्थिक अहवाल सादर करतात, तर सनातन संस्था साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा आणि ग्रंथ प्रकाशनांचा अहवाल सादर करते आणि हिंदु जनजागृती समिती धर्मसभा आणि धर्मरक्षणासाठीची राष्ट्रीय आंदोलने यांचा अहवाल सादर करते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जागतिक लोकसंख्येचा परिणाम !

‘एखाद्या थाळीमध्ये जंतूंची वाढ प्रमाणाबाहेर झाल्यावर जंतूंना थाळीतील अन्न पुरत नाही. त्यामुळे ते मरतात. अशीच आता पृथ्वीची स्थिती झाली आहे. पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ७५० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात … Read more