अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू

भगवान श्रीकृष्णाने गीतेत (अध्याय २, श्‍लोक ११) अर्जुनाला सांगितले, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्‍च भाषसे । म्हणजे हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तिवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सिंहाने प्राणी किंवा माणसाला मारणे आणि मनुष्याने प्राणीहत्या करणे यांतील भेद

कोणत्याही कर्मामागील हेतू काय असेल, त्यानुसार फळ मिळते. सिंहाला ज्या वेळी भूक लागते, त्या वेळी तो प्राण्यांना मारून पोट भरतो. तो माणसालाही मारू शकतो. ही नैसर्गिक क्रिया असल्याने येथे पाप-पुण्याचा प्रश्न येत नाही. मनुष्य स्वतःला शिकारीचे आणि मांस खाण्याचे सुख मिळावे; म्हणून तो प्राण्यांची हत्या करतो. तसेच द्वेष, लोभ, मत्सर, सूड घेणे इत्यादींसाठी एक मनुष्य … Read more

अधिवक्त्याला त्याने शिकवलेल्या भाषेत उत्तर देणारे अशील !

एका अधिवक्त्याने खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी आपल्या अशिलाला सांगितले, ‘न्यायाधिशांनी काहीही विचारले, तरी तू बॅह ऽ बॅहऽऽ असेच म्हणायचे’. दाव्याचा निकाल देतांना न्यायाधिशांनी हा माणूस वेडा आहे, असे समजून त्याला शिक्षा केली नाही. दावा जिंकल्यावर अधिवक्त्याने त्याच्याजवळ शुल्क मागितले. तेव्हा त्यालाही त्याने बॅहऽ बॅहऽऽ, असेच उत्तर दिले ! हुशार राजा फ्रान्समधील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात आलेला … Read more

राजकारण्यांच्या सभा व संतांच्या सभांमधील प्रमुख भेद !

राजकारण्यांना सभेला माणसे पैसे देऊन आणावी लागतात, तर संतांच्या सभांना आणि दर्शनाला हजारो, लाखो येतात आणि अर्पणही देतात ! – डॉ. आठवले (१७.५.२०१४)

धर्माबरोबर शक्ती नसल्याने जगाचा नाश अटळ !

विज्ञानशास्त्र शक्तीशी संबंधित शास्त्र आहे, तर अध्यात्मशास्त्र हे शिवाशी संबंधित शास्त्र आहे. शक्ती शिवाच्या म्हणजे धर्माच्या (सत्याच्या) समवेत असेल, तरच कल्याणकारक होईल. शक्ती शिवाच्या समवेत गेली नाही, तर नाशक (विनाशकारी) होईल. सर्वत्र भगवान आहे, मग मल-मूत्र विसर्जन कसे करणार ? मनुष्याच्या शरिरात सहस्रो जीवाणू मल-मूत्र विसर्जन करतात, तरी तो अपवित्र होत नाही. परमेश्वराच्या शरिरातच सर्व … Read more

भगवत्कथा ऐकण्यास जाण्याचे लाभ

१. कर्मयोग : कथेसाठी जाणे आणि येणे २. भक्तीयोग : श्रद्धा वाढणे ३. ज्ञानयोग : कथेचा सारांश समजणे प्रवचनाचे वैशिष्ट्य : प्रवचनकार श्रम करतो आणि फळ श्रोत्यांना मिळते ! पुढच्या जन्मी देवाण-घेवाण फिटण्याचे उदाहरण एक मुलगा मूठ मूठ माती घेऊन एका सापावर टाकत होता. सापाने फणा खाली घातला. तितक्यात दुसऱ्या एका माणसाने सापाला मोठा दगड … Read more

इंग्रजीप्रमाणे संस्कृतमध्ये शब्दलेखन (स्पेलिंग) शिकावे न लागणे

याचे कारण हे की, संस्कृतमध्ये उच्चारानुसार लिखाण असते. लिखाण डोळ्यांनी पहातो, म्हणजे ते तेजतत्त्वाशी संबंधित असते, तर शब्दाचा उच्चार करणे हे आकाशतत्त्वाशी संबंधित असते. तेजतत्त्वापेक्षा आकाशतत्त्व वरच्या स्तराचे असल्यामुळे लिखाणानुसार उच्चार न करता उच्चाराप्रमाणे लिखाण करणे आवश्यक असते. – डॉ. आठवले (१५.४.२०१४)

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !

पतीला पत्नीचे नियंत्रण नको आणि पत्नीला पतीचे नको. दोघांनाही स्वातंत्र्य हवे. विवाहामुळे, विशेषतः स्त्री-स्वातंत्र्यावर बंधने येतात; म्हणून आजची स्त्री बंधनमुक्त होऊ इच्छिते. तिला स्वातंत्र्य (?) हवे आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. काही मर्यादा सांभाळाव्याच लागतील. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिरुचीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य ही केवळ स्वैराचाराची वेगळी नावे आहेत. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (स्त्री-धर्म – ६, नोंदणी विवाहाच्या निमित्ताने…, पृ. … Read more

दया

अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन हे दयाळू म्हणून प्रसिद्ध होते. एकदा मित्रासमवेत घोडागाडीतून जात असतांना मित्र त्यांच्यावर थोर असूनही केवढा दयाळू इत्यादी स्तुतीसुमने उधळीत होता. लिंकन मित्राला सांगत होते, “बाबा रे, मी सत्यच सांगतो की, मी काही दयाळू नाही”. जाता जाता एक घोडा तारेच्या कुंपणात अडकून रक्तबंबाळ झालेला दिसला. लगेच लिंकन गाडीतून उतरले आणि त्यांनी घोड्यास … Read more

इंग्रजीप्रमाणे संस्कृतमध्ये शब्दलेखन (स्पेलिंग) शिकावे न लागणे

याचे कारण हे की, संस्कृतमध्ये उच्चारानुसार लिखाण असते. लिखाण डोळ्यांनी पहातो, म्हणजे ते तेजतत्त्वाशी संबंधित असते, तर शब्दाचा उच्चार करणे हे आकाशतत्त्वाशी संबंधित असते. तेजतत्त्वापेक्षा आकाशतत्त्व वरच्या स्तराचे असल्यामुळे लिखाणानुसार उच्चार न करता उच्चाराप्रमाणे लिखाण करणे आवश्यक असते. – डॉ. आठवले (१५.४.२०१४)