परंपरांच्या विरोधात जाऊन समाजसुधारणा करणारे पुरोगामी आणि साम्यवादी पापाच्या पायावर उभे असणे

‘हे साम्यवादी आम्हा परपंरावाद्यांचा ‘जड, यांत्रिक आणि निर्जीव’ असा उपहास करतात. आम्हाला ‘कालप्रवाहाची उपेक्षा करणारे आहोत’, अशा शिव्याही हासडतात. खरे तर हे पुरोगामी, हे साम्यवादीच त्या अर्थाने परंपरावादी आहेत. स्वत:ला गोरगरिबांचे कैवारी म्हणवणारे वरकरणी कितीही समाजकल्याण आणि लोकहित यांच्या गोष्टी करू देत, योजना बनवू देत, ते सर्व पापाच्या पायावरच उभे आहेत.’

भाषाशुद्धीद्वारे चैतन्याचा प्रसार !

‘परकियांच्या आक्रमणांमुळे मराठी भाषेत अन्य भाषांतील शब्दांचा शिरकाव झाल्याने मराठी भाषेची तेजस्विता आणि तिचा प्रभाव उणावला होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य भाषांतील शब्दांच्या ठिकाणी मराठी शब्दांचा उपयोग करायला लावून मराठी भाषेतील शब्दांना महत्त्व दिले. मराठी भाषेत योग्य शब्दाला खूप महत्त्व आहे. त्याला अर्थ आहे आणि त्यामध्ये कार्य करणारी शक्ती आहे; म्हणून त्याला ‘शब्दब्रह्म’ म्हटले … Read more

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते,…

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण, असे करणार्‍यांनाच माणूस म्हणता येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.११.२०१६)

हल्ली वृद्ध आई-वडिलांची काळजी त्यांची मुले घेत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात…

हल्ली वृद्ध आई-वडिलांची काळजी त्यांची मुले घेत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. त्याचप्रमाणे शेतकरी वृद्ध झालेल्या गायी-बैलांना खाटिकखान्यात पाठवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०१७)

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य…

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य बुद्धीअगम्य, म्हणजे बुद्धीपलिकडील, सूक्ष्म स्तरावरील असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे इत्यादी…

विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे इत्यादी करून निष्कर्ष काढतात. याउलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट…

विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कळते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे दुष्काळावर वरवरचे उपाय करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, तर कुठे बार्शीचे…

कुठे दुष्काळावर वरवरचे उपाय करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, तर कुठे बार्शीचे अश्‍वमेधयाजी पू. नाना काळे ! : दुष्काळ का होतो, हे समजून न घेता, टँकरने आणि आगगाडीने पाणी पाठवू !, असे राज्यकर्ते म्हणतात. अवर्षणग्रस्त भागातील साहाय्यातही भ्रष्टाचार करतात. मानवाच्या पापाचे भोग त्याला भोगावे लागत आहेत. ते अल्प करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे एकही राजकारणी सांगत … Read more

राष्ट्रसेवा म्हणून पोलीस दलात विनावेतन नोकरी करा, असे सांगितले, तरी…

राष्ट्रसेवा म्हणून पोलीस दलात विनावेतन नोकरी करा, असे सांगितले, तरी बहुतेक पोलीस नोकरी सोडणार नाहीत; कारण त्यांना त्यांच्या पगाराच्या अनेक पटींनी वरची रक्कम मिळते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले