आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

आजची बिघडलेली तरुण पिढी !

‘चेन्नई येथील उच्च न्यायालयाने आजच्या तरुण पिढीविषयी खेद व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘चित्रपटातील अश्‍लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढीच्या मनामध्ये दुष्ट विचार येतात आणि त्यात हिंसाचाराच्या घटना दाखवल्यामुळे तरुण पिढीची मने बिघडली आहेत. यासाठी चित्रपट क्षेत्रातील लोकांनी स्वतःचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासावी.’

अशा आई-वडिलांची मुले कशी असणार ?

‘आपला मुलगा सात्त्विक व्हावा, ईश्‍वरप्राप्तीला लायक व्हावा’, असे पूर्वीच्या आई-वडिलांना वाटायचे. आता ‘आपला मुलगा शिक्षण घेऊन नोकरीला लायक व्हावा, विदेशात जावा’, असे आई-वडिलांना वाटते !’

रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७१ वर्षे अनुभवले आहे.’

ईश्वरप्राप्तीसाठी गुरूंनी सांगितलेला जप करत असतांना काही आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत

‘एखादा रुग्ण मोठ्या आजारासाठी आधुनिक वैद्यांनी सांगितलेली औषधे घेत असला, तरी इतर आजार झाल्यावर तो इतर औषधेही घेतोच. तसेच गुरूंनी सांगितलेला जप त्यांचा शिष्य ईश्‍वरप्राप्तीसाठी करत असला, तरी जीवनात मोठ्या आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी गुरूंना संपर्क होऊ शकत नसल्यास इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत.’

भारताला ‘मागासलेला’ म्हणणे, यापेक्षा अधिक मूर्खपणा जगात कुठे सापडेल का ?

‘भारत सोडून इतर देशांतील पूर्वजांनी एकाही शोध लावलेला नाही. आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी जन्मापूर्वीचे आणि नंतरचे जीवन, अनेक युगे, सप्तलोक आणि सप्तपाताळ इत्यादी सर्वच विषयांवरील सर्व माहिती लिहून ठेवली आहे. एवढेच नव्हे, तर जन्म-मृत्यूंच्या फेर्‍यांतून मुक्त कसे व्हायचे, ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, या सर्वांबद्दलचे ज्ञानही लिहून ठेवले आहे. आपल्याला फक्त अभ्यास करून ते समजून घ्यायचे आहे. भारताची … Read more

वक्त्याचे बोलणे आत्मविश्‍वासपूर्वक असण्याचे महत्त्व

‘संवादातून सुसंवाद साधण्याच्या हातोटीवर पुष्कळ लोकांनी जीवनात यश मिळवले आहे. अनेकांना विषयाचे भरपूर ज्ञान असूनही इतरांवर तेवढा प्रभाव पाडता येत नाही. उलट अधिक ज्ञान नसूनही काही लोक उत्तम प्रभाव पाडू शकतात. याला कारण म्हणजे ‘संभाषणचातुर्य’. जो आपले विचार प्रभावीपणे मांडू शकतो, तोच लोकांची हृदये जिंकू शकतो. आत्मविश्‍वासपूर्वक केलेले छोटेसे संभाषणसुद्धा प्रभावी होऊ शकते. आपले प्रेमळ, … Read more

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही वर्षांनी पालटत असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले