व्यक्तीला आत्मोन्नत करणारा विकास, हाच खरा विकास !

‘पूर्वीच्या काळी असुर अमरत्वप्राप्तीसारख्या लोभापोटी तप करायचे, तर ऋषिमुनी सृष्टीच्या कल्याणासाठी तप करायचे. आज हिंदुस्थानातील अनेक जण स्वार्थापोटी भ्रष्टाचार करतात, स्वदेशात उच्च शिक्षण घेऊन देशातील गरिबी दूर करण्याऐवजी अधिक पैशांच्या हव्यासापोटी विदेशात नोकरी करतात आणि जल अन् वायू प्रदूषित करणारे कारखाने काढतात. अशासारखी दुष्प्रवृत्ती असणार्‍यांना कर्मफलन्यायानुसार फळ मिळणार, हे ठरलेले आहे.

आज शासनकर्ते देशाच्या विकासासाठी कार्यरत आहेत (?), त्याने व्यक्तीतील दुष्प्रवृत्ती पालटेल का ? केवळ भौतिक सुख-सुविधांनी सुसज्जित करणारा विकास हा विकास नव्हे, तर ‘व्यक्तीला आत्मोन्नत करणारा विकास’, हाच खरा विकास आहे. हे शासनकर्ते लक्षात घेतील का ? कारण अशा विकासामुळेच व्यक्तीला इहलोकी आनंदप्राप्ती तर होईलच; पण मृत्यूनंतर चांगली गती किंवा मोक्षही लाभेल. असा विकास साधण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देण्याविना पर्याय नाही !’

Leave a Comment